‘इफ्फी’ची तयारी सजावट आणि रंगरंगोटी, मात्र पावसाने फेरले पाणी

पावसाचा अडथळा; ‘ईएसजी’ची उडाली तारांबळ
‘इफ्फी’ची तयारी सजावट आणि रंगरंगोटी, मात्र  पावसाने फेरले पाणी
Rain in IFFI festival GoaDainik Gomantak

पणजी: भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेला असताना राज्यात सुरू झालेला पाऊस महोत्सवाच्या तयारीवर मोठा अडथळा ठरत आहे. या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी बाहेरील सजावट आणि रंगरंगोटीचे मोठे काम असते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सतत पाऊस पडत आहे, तर पुढचे चार दिवसही पाऊस पडणार असल्याचा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केल्याने या पावसाचा इफ्फीच्या तयारीवर परिणाम होणार आहे.

सध्या सजावटीसाठीची थिम असणारे कटआउट बनविण्याचे काम सुरू असून कारागीर रात्रंदिवस काम करत आहेत. मात्र, या कारागिरांना तात्पुरत्या शेडमध्ये काम करावे लागत आहे. पावसामुळे प्रत्यक्ष साईटवर मोजमापे घेता येत नसल्याचे मत कारागिरांनी व्यक्त केले आहे. याशिवाय सजावट बनविण्यावरही पावसाचा परिणाम होत आहे. दरम्यान, पावसामुळे कामात अडथळा येत असल्याने पाच दिवसांच्या आत इफ्फीनिमित्तची कामे उरकण्यासाठी ईएसजी धावपळ उडत आहे.

Rain in IFFI festival Goa
राजकुमार आणि पत्रलेखा यांच्या लग्नांच्या फोटोंनी नेटकर्यांना लावले वेढ!

‘गोवन विभागा’साठीचे निर्बंध मागे

इफ्फीमध्ये सुरू केलेल्या ‘गोवन विभागा’ची आज अंतिम मुदत होती. आतापर्यंत केवळ १ फिचर फिल्म, तर ७ नॉन फिचर फिल्म या विभागात आले आहेत. इंडियन पॅनोरमामधील परीक्षकांच्या निर्णयानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठी ४ फिल्मची अट मागे घेतली आहे.

तांत्रिक समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कमिटीने महोत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची, तयारीची पाहणी केली असून महोत्सवासाठी लागणारे थिएटर आणि मशिनरी आंतरराष्ट्रीय नियमानुसार आहेत. यावेळी कला अकादमी वापरता येणार नसले, तरी पर्वरीतील आयनॉक्सचे चार थिएटर यावेळी आपल्याकडे आहेत.

- राम यादव सहाय, सदस्य, तांत्रिक कमिटी

इफ्फीच्या तयारीची कामे ठरलेल्या वेळेनुसार पूर्ण होत आहेत. पावसाचा काहीसा सजावटीवर परिणाम होईल. मात्र, आम्ही युद्धपातळीवर काम करून इफ्फीसाठीच्या सजावटीचे सर्व काम पूर्ण करू.

- सुभाष फळदेसाई, उपाध्यक्ष, ईएसजी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com