अभिनेते राज कपूर सिनेसृष्टीचे चालते- बोलते विद्यापीठ... !

अभिनेता म्हणून ते माझे नेहमीच प्रेरणास्थान राहीले असल्याचे रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी यावेळी म्हटले.
अभिनेते राज कपूर सिनेसृष्टीचे चालते- बोलते विद्यापीठ... !
Raj KapoorDainik Gomantak

अभिनेता राज कपूर (Raj Kapoor) हे सिनेचे चालते बोलते विद्यापिठ होते. मग तो विषय अभिनयाचा असो, दिग्दर्शनाचा असो,संगीत नावडीचा असो व सिनेमांच्या अन्य बाबतीत असो...ते इनबोर्न कलाकार होते असे मत त्यांचे पुत्र आणि प्रसिध्द अभिनेता रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी व्यक्त केले. वडील म्हणून राज कपूर नेहमीच माझे हिरो राहीले आहेत. परंतु त्याहीपेक्षा अभिनेता म्हणून ते माझे नेहमीच प्रेरणास्थान राहीले असल्याचे रणधीर कपूर यांनी यावेळी म्हटले. ते "इन कोनवरसेशन विथ" या कार्यक्रमात रिज कपूर-मास्टर आॅफ वर्क" या पुस्तकावर आधारीत चर्चासत्रात बोलत होते.

Raj Kapoor
आला लेट पण आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत गेला थेट..!

राज कपूर यांचे सर्व बाबतीत बारकाईने निरीक्षण असायचे.त्यांचा सिनेमा माणसाच्या दैनदिन संर्घषाशी जोडलेला असायचा.कामात व्यग्र होणे हीच जणूकाही त्यांची आवड होती असे मत रणधीर यांनी व्यक्त केले. पुस्तकाचे लेखक राहुल रवैल यांनी या पुस्तकाच्या लेखनाविषयी माहीती दिली.आ.र.के स्टुडीयो मध्ये राज कपूर यांच्या बरोबर काम करतानाचा अनुभव मी या पुस्तकात शब्दबद्ध केल्याचे ते म्हणाले. रिज कपूर यांचे जेवण सुद्धा सिनेमात "फीट "व्यक्तीमहत्व कशा पद्धतीने असावे यावर अवलंबून होते असे ते म्हणाले. त्यांच्या सोबत काम करणे म्हणजे मोठी पर्वणी होती.ते कामाच्या शिस्तीबाबत खुप कडक होते असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com