सेबीचा राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टी ला मोठा दणका

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
सेबीचा राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टी ला मोठा दणका
Raj Kundra & Shilpa ShettyDainik Gomantak

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बुधवारी सेबीने उभयांताना दंड ठोठावला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मालकीच्या विआन इंडस्ट्रीजवर (Vian Industries) समभाग गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करताना भांडवली बाजार नियमकाने (SEBI) तीन लाख रुपये भरण्याचा आदेश जारी केला आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हिंदुस्तान सेप्टी ग्लास इंडस्ट्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विआन इंडस्ट्रीजचे प्रवर्तक आहेत.

10 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी विआन इंडस्ट्रीज भांडवली बाजारामध्ये सूचीबध्द कंपनी आहे. यापूर्वी 2015 दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारावर ही कारवाई शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर करण्यात आलेली आहे.

Raj Kundra & Shilpa Shetty
राज कुंद्रा 'शमिता शेट्टी'ला करणार होता कास्ट; गेहाना वशिष्ठचा खुलासा

ऑक्टोबर 2015 मध्ये विआन इंडस्ट्रीजने 2.55 कोटी रुपयांचे 5 लाख समभाग राज कुंद्रा आणि शिल्पा यांच्यासह आणखी चार जणांना जारी करण्यात आले होते. मात्र याबाबतच्या कायदेशीर नियमांचे पालन करण्यात आला नसल्याचा ठपका देखील सेबीने यावेळी ठेवला आहे. याबाबत नियमकाला कळविण्यात आले नसल्याचे देखील बुधवारी सेबीने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com