तासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज

तासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज
Raj kundra Shilpa Shetty

शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट आणि परफेक्य कपलपैकी एक आहेत. राज यांचे हे दुसरे लग्न आहे. जेव्हा ते आणि शिल्पा यांच्यात जवळीक वाढली होती आणि दोघांनीही लग्न केले होते, तेव्हा राजची पहिला पत्नी कविता म्हणाली होती की शिल्पा शेट्टीच तिच्या आणि राजच्या मध्ये आली आणि त्यांचे लग्न मोडले. अलीकडेच कविताची एक जुनी मुलाखत बरीच व्हायरल होत होती, त्यानंतर अलीकडे राजने आपल्या भूतकाळातील आणि पहिल्या पत्नीबद्दल मोठा खुलासा केला आहे.(Raj Kundra talk About his ex wife Therefore Shilpa Shetty was upset)

ती माझ्या बहिणीच्या नवऱ्याशी जवळीक साधत होती

शिल्पाने याबद्दल बोलण्यास त्याला नकार दिला होता कारण त्याचा काही उपयोग होणार नाही असे शिल्पाचे मत होते. पण राजने आपला मुद्दा सर्वांसमोर ठेवला, आणि सांगितले की, 'माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि ती माझ्या घरातील सर्व सदस्यांशी भांडत होती. आम्ही एकाच घरात राहत होतो आई, वडील, बहीण आणि तिचा नवरा. कारण ते त्यावेळी भारतातून युकेमध्ये स्थायिक झाले होते. ती माझ्या बहिणीच्या नवऱ्याशी जवळीक साधत होती. विशेषत: जेव्हा मी व्यवसायाच्या निमित्ताने दूर गेलो होतो तेव्हा त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत होती. माझ्या कुटुंबातील अनेकांनी एवढच नाही तर ड्रायव्हरनीसुद्धा सांगितले की दोघांमध्ये काहीतरी चालू आहे, परंतु कोणाच्याही सांगण्यावर माझा कधीच विश्वास नव्हता. मी माझ्या दोन्ही  कुटुंबांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतो होतो. 

बाथरूममध्येच तासभर वेळ घालवायला लागली

'त्यानंतर माझी बहीण आणि तिचा नवरा परत भारतात आले कारण एकत्र राहण्यामुळे सर्व काही ठीक होत नव्हते. माझे  मेहुणे आणि माझी पहिली पत्नी एकत्र काम करण्यासाठी जात होते. एकाच खोलीत एकत्र बसायचे. तेव्हा माझ्या बहिणीला असे वाटले की भारतात परत जाणे चांगले. यानंतर, जेव्हा या विषयावर कोणी बोलत होते, तेव्हा मी ऐकण्यास नकार द्यायचो. मग जेव्हा मला कळले की माझी पहिला पत्नी गरोदर आहे, तेव्हा मी खूप खूश झालो. आम्हाला एक मुलगी झाली आणि नंतर घरी आल्यावर मला असं जाणवलं की माझी पहिला पत्नि बाथरूममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत होती. 20-30 मिनिट ती बाथरूममध्ये वेळ घालवत होती. आणि नंतर काही दिवसात ती एक तासभर बाथरूममध्येच रहायला लागली, सुरुवातीला मला वाटले की कदाचित तिच्या नुकत्याच झालेल्या प्रसूतीमुळे असे झाले असेल, परंतु सत्य काहीतरी वेगळच होतं.

मग सत्य बाहेर यायला लागलं
राज म्हणाला, 'एक दिवस मला माझ्या बहिणीचा भारतातून फोन आला आणि ती रडत म्हणाली की, मला माझ्या पतीचा दुसरा फोन मिळाला आहे ज्यामध्ये यूके नंबरवरून खूप प्रेमळ मेसेज आले आहेत. त्या मेसेजमध्ये त्या दोघांनी एकत्र घालवलेल्या क्षणाचे वर्णन होते. यूकेच्या नंबरवरून एक मेसेज आला ज्यात असे लिहिले आहे की, तू मला सोडून गेलास आणि आता मला तुझी आठवण येत आहे. तू परत ये. तेव्हा मी लगेच माझ्या बहिणीला तो नंबर मला सेंड करायला सांगितला. त्यानंतर माझ्या मित्राच्या मदतीने कळले की हा नंबर माझ्या घराशेजारी असलेल्या एका टॉवरशी जोडलेला आहे. त्यानंतर मला संशय आला.

बाथरूममध्ये बॉक्सवर सापडला फोन

एक दिवस कविता शॉपिंगला गेली होती तेव्हा मी फोन शोधण्यास सुरवात केली आणि   मला बाथरूममध्ये असलेल्या बॉक्सवर एक फोन सापडला. मी फोन चालू केला त्यावर बरेच मेसेज आले होते. त्या दिवशी मला धक्काच बसला आणि मी खूप रडलो. विचार केला की मी असं काय केलं की हे माझ्या बाबतीत घडलं. मी माझ्या गर्भवती बहिणीला सांगितले की तो नं. माझ्या माजी पत्नीचा आहे आणि मी तिला आता तिच्या घरी सोडणार आहे. तिच्याशी असलेले संबध तोडतो आहे. तिला स्वतःच काय करायच तो विचार ती करेल. माझी बहीण गरोदर होती आणि ही बातमी ऐकून तिलाही धक्काच बसला.

बहिणीने सांगितले की तिला आता आपल्या पतीबरोबर राहायचे नाही, परंतु मी तीला सांगितलं की तु असा बिेहेव कर जसं काही घडलंच नाही. दरम्यान माझी पहिली पत्नी तिच्या घरी जाण्याचा विचार करीत होती. मी भारतात गेलो आणि माझ्या बहिणीला आणि मुलांना आणले आणि मुल झाल्यावर मुलगी आपल्या माहेरी जाते त्या प्रथेच्या बहाण्याने मी पत्नीला तिच्या घरी सोडले. ती शेवटची वेळ होती जेव्हा मी माझ्या पहिल्या पत्निला घरी सोडले. 40 दिवसाच्या माझ्या मुलीला बाय म्हणणे माझ्यासीठी खुप त्रासदायक होतं.

खोटी बातमी दिली
राज पुढे म्हणाला, 'यानंतर जेव्हा मी शिल्पाला भेटलो आणि आमची मैत्री झाली आणि माझ्या पहिल्या पत्नीला हे कळले तेव्हा तिने आपली मागणी वाढविली. पैशासाठी त्याने खोटी कहाणी केली की शिल्पामुळे आमचे लग्न मोडले असे सांगितले. त्यावेळी शिल्पा बद्दल बऱ्याच चर्चाही रंगल्या होत्या.

शिल्पा दु: खी आहे
या मुलाखतीनंतर राज यांनी माध्यमांना सांगितले की शिल्पा माझ्या या मुलाखतीनंतर थोडी दु: खी झाली आहे. मी त्या जुन्या किस्सांबद्दल बोलू नये असे तिला वाटत होते, परंतु सत्य बाहेर येणे गरजेचं होत म्हणून मी व्यक्त झालो.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com