या गोष्टींसाठी राज कुंद्राला घ्यावी लागणार कोर्टाची परवानगी

राज कुंद्रा यांना जामीन मिळाला असून आता त्याच्या जामीन आदेशाची प्रत समोर आली आहे.
Raj Kundra
Raj Kundra Dainik Gomantak

पॉर्नोग्राफी प्रकरणात (pornography case) राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली होती, तब्बल 2 महीने तुरुंगवासानंतर अखेर राज कुंद्रा यांना कोर्टाने जमीन मंजूर केला आहे. राज कुंद्रा यांना जमीन मिळाला (Raj Kundra got bail) असला तरी त्यांना कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे लागणार आहे. राज कुंद्रा हे कोर्टाच्या आदेशाशिवाय देश सोडू शकत नाही (cannot leave the country), जर त्यांनी पत्ता बदलला तर तसे त्यांना गुन्हे शाखेला सांगावे लागेल.

Raj Kundra
कंगनाने जावेद अख्तरांवर झाडल्या आरोपांच्या फैरी, काऊंटर केस केली दाखल
Raj Kundra Bail Order
Raj Kundra Bail OrderDainik Gomantak

जामीन आदेशात असे म्हटले आहे की, आरोपीच्या जबाबानुसार त्याने चुकून हा गुन्हा केला आहे; आणि त्यात त्याची सक्रिय भूमिका नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला सोमवारी 50 हजारांचा दंड ठोठवण्यात आला आहे. राज कुंद्रा यांना जामीन मिळाला असून आता त्याच्या जामीन आदेशाची प्रत समोर आली आहे, त्यानुसार राज न्यायालयाच्या आदेशाशिवाय देश सोडू शकत नाही. यासह, त्यांना त्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांक योग्यरित्या द्यावा लागेल. जर पत्ता बदलला असेल तर त्याची माहिती गुन्हे शाखेला द्यावी लागेल.

Raj Kundra
दिपिका पदुकोण अन् पी.व्ही सिंधू बॅडमिंटन खेळताना दिसल्या एकत्र; पाहा Video
Raj Kundra Bail Order
Raj Kundra Bail OrderDainik Gomantak

राज कुंद्रावर लागली अनेक कलमे

आदेशात म्हटले आहे की, आरोपपत्रात 354 सी, 292, 293, 420, 66 ई, 67 यासह अनेक कलमे आरोपी राज कुंद्राआणि रायन थार्प यांच्यावर लावण्यात आली आहेत.

तपास अधिकाऱ्याच्या ताब्यात सर्व गोष्टी

कोर्टाने सांगितले की, वियान इंडस्ट्रीजचे सर्व्हर, लॅपटॉप आणि मोबाईल तपास अधिकाऱ्याच्या ताब्यात आहेत. त्यामुळे पुराव्याशी छेडछाड होऊ शकते, असे म्हणता येणार नाही. सायबर तज्ज्ञांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com