थलैवा रजनीकांत रुग्णालयातून घरी परतले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 डिसेंबर 2020

दक्षिणेतील दिग्गज अभिनेते रजनीकांत (वय ७०) यांना  अपोलो रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

हैदराबाद :  दक्षिणेतील दिग्गज अभिनेते रजनीकांत (वय ७०) यांना काल अपोलो रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. उच्च रक्तदाबामुळे त्यांना २५ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल केले होते. रजनीकांत यांची प्रकृती चांगली असून आता काळजी करण्यासारखे काहीही नाही, ब्लड प्रेशर आता नियंत्रणात असल्याची माहिती डॉक्टरांच्या टीमने दिली आहे. असे रुग्णालयाच्या निवेदनात म्हटले आहे. अपोलो रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सुपरस्टार रजनीकांत घरी जाण्यासाठी फीट असल्याचे सांगितले. 

संबंधित बातम्या