राखी म्हणाली, रामदेव बाब हाच मोठा कोरोना

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 जून 2021

राखीने सध्या एका लेटेस्ट व्हिडीओ मध्ये रामदेव बाबा यांची तुलना कोरोनाशी केली आहे. 

राखी सावंतला (Rakhi Sawant) बॉलिवूड (Bollywood) ड्रामा क्वीन म्हणून ओळखले जाते. तीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडिया(Social media) प्रचंड व्हायरल होत आहेत. राखीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमी चर्चेत असते. ती सध्या दमनमध्ये सुरु असलेले 'इंडियन आयडल 12' (Indian Idol 12) ची शुटिंग संपवून मुंबईत (Mumbai) परत अली आहे. नुकत्याच झालेल्या शोमध्ये राखी मराठी लूकमध्ये दिसली, या लूकमधील राखीचे फोटो देखील प्रचंड व्हरायल होत आहेत

राखीने सध्या एका लेटेस्ट व्हिडीओ मध्ये रामदेव बाबा(Ramdev Baba) यांची तुलना कोरोनाशी केली आहे. तिचा हा लेटस्ट व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी(viral bhayani) याच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. राखीच्या या सोशल मीडिया व्हिडीओ वर चाहत्यांच्या एकसोएक कमेंट देखील पाहायला मिळत आहेत. एका यूजर्स ने राखीच्या व्हिडीओ वर कमेंट करत, राखी जे बोलते अगदी ते स्पष्ट आणि सडेतोड बोलते असे म्हणले आहे. तर एका यूजर्सने पहिल्यांदा काही तरी खरं बोलली'. अशी कमेंट दिली आहे.(Rakhi said Ramdev is the big corona)

अखेर विकी आणि कॅटरीनाच्या नात्यावर शिक्कामोर्तब 'या' अभिनेत्याचा...

राखी सावंत ने काळ्या रंगाचा पोल्का डॉटचा टॉप घातला आहे. " अरे भगवंता हा जो कोरोना आहे तो एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. कोरोना(Corona) कधी येतो तर कधी लपून जातो तर कधी बाहेर निघून जातो" असे राखी सावंत म्हणाली. राखी सावंतचा हा लेटेस्ट व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हरायल झाला आहे. 

योगगुरू रामदेव बाबा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. कोरोनाच्या उपचार पद्धतीतील अ‍ॅलोपथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनील किटमुळे कोरोना बरा होता असा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला होता. त्यामुळे डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली जातं आहे.

संबंधित बातम्या