'माझं प्रेम शोधतेय' राखी सावंतचा भन्नाट व्हिडिओ होतोय व्हायरल

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

आता राखी मस्तानीच्या गेटअपमध्ये दिसत आहे.

बॉलिवूडमधील(Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कोणत्या कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. राखीचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमावर (Social Media) नेहमीच व्हायरल होताना दिसतात. कधी भाजी आणण्यासाठी जाताना ती पीपीई किट घालून जाते तर कधी आणखी काही. आता राखी मस्तानीच्या गेटअपमध्ये दिसत आहे.

राखीचा एक नवीन  व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखीने मस्तानीचा पोशाख परिधान केला आहे.  एवढच नाही तर राखी रस्त्यावर फिरत आहे. राखी रस्त्यावर फिरताना म्हणते की, 'माझं प्रेम शोधते'. (Rakhi Sawants abandoned video of Finding My Love goes viral)

''जर मी मुख्यमंत्री झाली तर..'' हुमा कुरेशीने केला खुलासा

पुढे राखी म्हणते,  ''ना लस मिळत आहे ना, कपड्यांची दुकाने सुरु होत आहेत. त्यामुळे मी भटकत आहे. ना मुंबई पुन्हा नव्याने उघडतेय, ना लॉकडाऊन (Lockdown) हटतोय, मी खूप चिंतेत आहे. ना मी 'खतरों के खिलाडी' मध्ये सहभागी होऊ शकले, एकच चान्स  होता माझ्या नवऱ्याला भेटायचा 'नच बलिए' शो ही बंद होत आहे. आता मी माझ्या नवऱ्याला कशी शोधू. मला तुम्ही मला मीरा बोला किंवा मस्तानी बोला मी माझ्या बाजीरावाला शोधत आहे.''

राखीचे असे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. राज्यात लॉकडाऊन असला तरी राखी सावंत कोणत्या कोणत्या प्रकारे तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by The Khabri (@realthekhabri)

संबंधित बातम्या