राखी सावंतचा नागीन अवतार

राखी सावंतचा नागीन अवतार
Rakhi Sawant's serpent incarnation

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री राखी सांवत तिच्या वक्त्यव्य़ावरुन सतत चर्चेत असते. समाजमाध्यमातून राखी आपल्या चाहत्यांना वेगवेगळी सरप्राईजेसही देत असते. आताही राखी तिच्या एका नव्या व्हिडोओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओमध्ये राखी श्रीदेवी यांच्या नागीन चित्रपटातील वेशात दिसत आहे. आपल्या सोशल मिडिया आकाऊंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. प्रसिध्द अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नागीन चित्रपटातील ‘मैं तेरा दुश्मन, दुश्मन तु मेरा’ या गाण्यावर या व्हिडिओमध्ये डान्स करत असताना दिसत आहे.

राखीने या गाण्यातील श्रीदेवींचा मूळ चेहरा काढून आपला चेहरा त्या ठिकाणी लावला आहे. आणि या व्हिडिओ खाली कॅप्शन देताना ती म्हणते, ‘’मला अभिनेत्री श्रीदेवीजी फार आवडतात. मला त्यांच्या अनेक चित्रपटांपैकी नागीन हा चित्रपट खूप आवडतो. या चित्रपटाचा रिमेक करायचा असल्यास त्या भूमिकेसाठी कुणाचा विचार करण्यात यावा याचा विचार करा आणि कमेंट करत आपली पसंती कळवा.’’

राखीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी, चाहत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. राखीने बिग बॉस शोच्या नुकत्याच झालेल्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता. तिच्या या सहभागानंतर चाहत्यांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती. बिग बॉस चा शो संपल्यानंतर राखी सध्या तिच्या आईच्या उपचारांमध्ये व्यस्त आहे. तिची आई कॅन्सर सारख्या आजाराचा सामना करत आहे. बिग बॉस शो मधून तिने 14 लाख रुपये घेऊन एक्झिट केली होती. आईच्या उपचारासाठी पैशाची गरज असल्य़ाचे राखीने सांगितचले होते. 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com