Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यातली गर्दी पाहून बॉलिवूड दिगदर्शकाचा संताप अनावर

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर लाखो लोक हरिद्वारमध्ये शाहीस्नानासाठी एकत्र आलेले आहेत. एकूणच या सर्व ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन झाल्याचे दिसून येते आहे.

देशात दररोज लाखो लोक कोरोना विषाणूने बाधित होत असून, हजारो लोक आपला जीव गमावता आहेत. तर दुसरीकडे देशातील काही राज्यांत निवडणुकांचे पडघम वाजता आहेत आणि त्याचवेळी कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर लाखो लोक हरिद्वारमध्ये शाहीस्नानासाठी एकत्र आलेले आहेत. एकूणच या सर्व ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचेही उल्लंघन झाल्याचे दिसून येते आहे. कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीवर रंगवला वर्मा यांनी ट्विट च्या माध्यमातून टीका केली आहे. (Ram Gopal Varma criticizes the crowd at Kumbh Mela)

नुकत्याच समोर आलेलया आकडेवारीनुसार कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे गेल्या पाच दिवसांत सुमारे 1,300 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर हरिद्वारमध्ये (Haridwar) 14 दिवसांत 3885 कोरोनाची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याच पार्शवभूमीवर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटच्या माध्यमातून रामगोपाल वर्मा यांनी "लाखो लोक कुंभमेळ्यात आपले पाप धुण्यासाठी येत असून, कोरोनाचा (Corona) आशीर्वाद घेता आहेत. त्यानंतर हे लोक लाखो लोकांना सुद्धा कोरोनाची ही भेट देता आहेत. आणि जेव्हा हे लोक मरण पावतील तेव्हा त्यांना दुप्पट कर्म मिळेल." अशी खोचक टिप्पणी केली आहे. 

रामगोपाल वर्म यांनी (Ram Gopal Varma) पुढे अजून एक ट्विट करत  "17 लाख मुंबईकरांना कोरोनाची लस घ्यायला 6 आठवडे लागले, तर महाकुंभात अवघ्या एका दिवसात 35 लाख लोकांनी स्नान केले. यावरुन हे निदर्शनास येते की, या जीवनापेक्षा लोकांना त्यांच्या पुढच्या जीवनात अधिक रस आहे" अशीही चपरख लगावली आहे.  याशिवाय राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये हजारो लोक दिसत आहेत. 

संबंधित बातम्या