Ram Gopal Varma - Rajamauli : राम गोपाल वर्मांनी दिग्दर्शक राजामौलींना दारुच्या नशेत दिल्या धमक्या? काय आहे प्रकरण?

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माने दिग्दर्शक एस.एस राजामौली यांना धमकी दिली आहे.
Ram Gopal Varma
 S. S Rajamauli
Ram Gopal Varma S. S RajamauliDainik Gomantak

Ram Gopal Varma - Rajamauli दिग्दर्शक एस.एस राजामौली यांच्या नावाची चर्चा आता फक्त भारतातच नाही तर जगभरात गाजत आहे, इतकं की हॉलीवूडचा दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनने त्यांना एकत्र चित्रपट करण्याची ऑफर दिली आहे. पण आता रामगोपाल वर्मा(Ram Gopal Varma) यांच्यामुळे चर्चेत आलं आहे. ट्विट्टरवर (Twitter) सुरू झालेला हा वाद आता सोशल मिडीयावर (social media) चर्चेचा विषय झाला आहे.

राम गोपाल वर्मा अधूनमधून सोशल मीडियावर काहीतरी लिहितात ज्यामुळे ते वादात सापडतात. आता त्यांनी एसएस राजामौली यांच्याबद्दल एक ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. रामगोपाल वर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत दिग्दर्शकाला 'जीवे मारण्याची धमकी' दिली आहे .

 नुकताच 'आरआरआर'ने 'नाटु नाटु' या गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आणि आता ते ऑस्करच्या शर्यतीत आहे. राजामौलीच्या या विजयाने आनंदी झालेल्या दिग्दर्शक राम गोपाल वर्माने त्यांचे कौतुक केले, पण गंमतीने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. 

रामगोपाल वर्मा यांनी राजामौली यांना त्यांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आणि दावा केला की तो चित्रपट निर्मात्यांच्या गटाचा भाग होता ज्यांनी निराश होऊन राजामौली यांना मारण्याचा निर्णय घेतला. ट्विट्टरवर हे सगळं सुरू असताना युजर्सना मात्र या गोष्टीचा धक्का बसला आहे.

Ram Gopal Varma
 S. S Rajamauli
Luv Ranjan : माझ्या चित्रपटात नेहमी महिलाच का असतात व्हिलन? सांगतोय स्वत: लव रंजन

राम गोपाल वर्मा यांच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. राम गोपाल वर्मा यांनी 4 ड्रिंक्स पिऊन हे ट्विट केल्याचेही सांगितले. म्हणजेच नशेची अवस्था आहे. राम गोपाल वर्मा यांच्या या कृतीने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अलीकडेच RRR मूव्हीच्या ट्विटर हँडलद्वारे एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे.

यामध्ये हॉलीवूडचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन एसएस राजामौली यांना जेव्हा जेव्हा त्यांना येथे चित्रपट बनवायचा असेल तेव्हा त्यांना सांगण्यास सांगताना दिसत आहे. राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करत राजामौलींचे कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com