Ranbir-Alia : रणबीर-आलियाचे चित्रपट एकमेकांना भिडणार..'अ‍ॅनिमल' आणि 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये कोण बाजी मारणार?

अलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे दोघे नवरा -बायको असले तरी त्यांचे चित्रपट एकमेकांना भिडणार आहेत.
Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी रील आणि रिअल लाइफमध्ये चांगलीच जमलीय आणि. दोघांचं चित्रपटांमधलं करिअरही चांगलं आहे . ब्रह्मास्त्रमध्ये हे दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. दोघांच्या कामाचं प्रेक्षकांनी कौतुकही केलं होतं

नुकतेच आई-वडील झालेले हे स्टार्स पुन्हा त्यांच्या चित्रपटात सक्रिय झाले आहेत. अलीकडेच आलिया भट्टच्या हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. विशेष म्हणजे या वर्षी पती-पत्नीचे दोन्ही चित्रपट एकमेकांना भिडणार आहेत.

गेल्या वर्षी आलिया भट्ट तिच्या हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेली होती. तिथून तिने सगळ्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली. त्यावेळी आलियाच्या प्रेग्नेंसीचे सुरुवातीचे महिने सुरू होते चित्रपटाचं काम तरीही सुरू होतं. 

हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटातून ही आलीया हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियरसाठी सज्ज आहे.

आलिया भट्टसाठी हा दिवस खूप खास असणार आहे कारण याच तारखेला तिचा पती रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत रणबीरसाठी ही आनंदाची बाब आहे की पती-पत्नीचे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित अ‍ॅनिमल हा क्राइम ड्रामा आहे.

 हा चित्रपट संपूर्ण भारताचा असं म्हणावं लागेल ;कारण हा चित्रपट हिंदी सोबतच तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

Alia Bhatt
Pathan Advance Booking :'पठाण'चं अॅडव्हान्स बुकींग जोरात, रेकॉर्ड मोडण्यासाठी चित्रपट सज्ज...

आता कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलते की दोन्ही आपापल्या तारखेला प्रदर्शित होतील हे पाहायचे आहे. असे झाले तर कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडेल. 

रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल रणबीरच्या अ‍ॅनिमलमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दुसरीकडे, हार्ट ऑफ स्टोनमध्ये गाल, जेमी आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त सोफी ओकोनेडो, मॅथियास श्वाइघोफर, झिंग लुसी आणि पॉल रेडी देखील आहेत.

आता बघुया नवरा -बायकोच्या या चित्रपटांच्या रेसमध्ये कोणता चित्रपट बाजी मारेल. दोघांनीही आपण एका समृद्ध अभिनय परंपरेचे वारस आहोत हे सिद्ध केलं आहे. त्यामुळे आता दोघांच्या चित्रपटांची जोरदार टक्कर होणार हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com