'स्वातंत्र वीर सावरकर'मधील रणदीप हुडाचा पहिला लूक आऊट

आता चाहत्यांना 'स्वातंत्र वीर सावरकर' या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे.
Randeep Hooda Veer Savarkar Look
Randeep Hooda Veer Savarkar LookInsta/Randeep Hooda

रणदीप हुड्डाने 'हायवे', 'सरबजीत' आणि 'बागी 2' सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रणदीप (Randeep Hooda) अशा बॉलीवूड अभिनेत्यांपैकी एक आहे जे आपल्या व्यक्तिरेखेला जिवंत करण्यासाठी आपले पुर्ण प्रयत्न पणाला लावतो.

आता चाहत्यांना त्याच्या 'स्वातंत्र वीर सावरकर' या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असेल, ज्यामध्ये रणदीप त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून रणदीपचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Randeep Hooda Veer Savarkar Look
Shahid Kapoor: शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'चा सिक्वेल लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीस

या लूकमध्ये रणदीप हुड्डाला ओळखणे कठीण होत आहे. आज 28 मे रोजी वीर सावरकरांची जयंती आहे आणि या खास प्रसंगी निर्मात्यांनी चित्रपटातील रणदीप हुड्डा यांचा लुक शेअर केला आहे. ऑगस्ट 2022 पासून, चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार बेटांवर अशा विविध ठिकाणी केले जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत.

याआधी वीर सावरकर सरबजीतच्या बायोपिकमध्ये दिसला होता

रणदीप दुसऱ्यांदा बायोपिकमध्ये दिसणार आहे. याआधी 2016 च्या बायोपिक 'सरबजीत'मध्ये त्याचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला. रणदीप या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. या भूमिकेसाठी त्याची निवड झाल्यामुळे तो आनंदी आहे.

Randeep Hooda Veer Savarkar Look
Katrina Kaif शिवाय सलमान खान 'या' अभिनेत्रींना करतो फॉलो, यादी पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य !

सावरकर असे अनेक नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अशी व्यक्तिरेखा चित्रपटाच्या रूपाने पडद्यावर साकारण्याचे सौभाग्य मला मिळाले त्याबद्दल मी खूप आनंदी आहे,असे तो म्हणाला. रणदीप हुड्डा शेवटचा 2021 मध्ये सलमान खानच्या 'राधे' चित्रपटात दिसला होता. याशिवाय त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये अनफेअर अँड लव्हली या चित्रपटाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com