Rani Mukerji : तापाने फणफणत असतानाही आमिरने 'गुलाम'चे शूटींग कसे पूर्ण केले? राणी मुखर्जीने सांगितला किस्सा..

अभिनेत्री राणी मुखर्जीने आमिर खानचे कौतुक करत एक किस्सा सांगितला आहे
rani mukharji
rani mukharjiDainik Gomantak

अभिनेत्री राणी मुखर्जी हिने एका शोमध्ये आमिर खानचे खूप कौतुक केले आहे. 'गुलाम' चित्रपटाचा एक किस्सा शेअर करत राणीने आमिरचे कौतुक केले आहे. तिचा सहकलाकार आमिर खान ब्रेक न घेता काम करत राहिला आणि ती तिच्यासाठी कामाला महत्त्व देण्याची प्रेरणा बनली असं म्हणत राणीने हा किस्सा सांगितला आहे.

जेव्हा राणीने 'इंडियन आयडॉल 13' मध्ये स्पर्धक सेंजुती दासचे विक्रम भट्ट दिग्दर्शित 1998 च्या 'गुलाम' चित्रपटातील 'जादू है तेरा'चे सादरीकरण पाहिले, तेव्हा तिने हिमाचल प्रदेशातील मनाली येथे आमिरसोबतच्या शूटिंगचा किस्सा सांगितला.

राणीने सेंजुतीला सांगितले: "जेव्हा तू 'गुलाम' मधील गाणे गाण्यास सुरुवात केलीस तेव्हा माझ्या समोर फ्लॅशबॅक आला कारण जेव्हा मी 'गुलाम'चे शूटींग सुरू केले तेव्हा मी फक्त 17 वर्षांची होते. भारतातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक असलेला आमिर खान माझ्या बरोबर होता.

मला चांगले आठवते की आम्ही गाण्यासाठी मनालीमध्ये शूटिंग करत होतो आणि आमिरला खूप ताप आला होता. त्याच सुमारास मी एका कलाकाराच्या डेडीकेशनची साक्षीदार होते जो ताप असतानाही काम करत राहिला."

" एक नवोदित म्हणून माझ्यासाठी, माझ्या सहकलाकाराची ही एक प्रशंसनीय गुणवत्ता होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मी जीवनात वाढ करत राहिले. जेव्हा कामाचा प्रश्न येतो तेव्हा कोणतीही सबब असू शकत नाही. शेवटी ते काम आहे.

सर्वात महत्वाचे. मी हे देखील ऐकले आहे की तू किती स्वतंत्र आहेस, तू तुझ्या आई-वडिलांची देखील काळजी घेतेस आणि तू स्वतःहून इथपर्यंत पोहोचली आहेस. ट्रॉफी जिंकून तुझी सर्व मेहनत पूर्ण होवो अशी मी प्रार्थना करते."

rani mukharji
Gadar 2 Video Viral : गदर 2 चे चित्रपटाचे शूटींग पूर्ण, हा शेवटचा सीन बघून थक्क व्हाल...

स्पर्धकाचे तिच्या कॅटेगिरीबद्दल आणि तिच्या २०१२ मध्ये आलेल्या 'अय्या' या चित्रपटातील 'आगा बाई' आणि 'गुलाम' मधील 'जादू है तेरा' आणि या दोन वेगळ्या गाण्यांबद्दल कौतुक करताना, राणी पुढे म्हणाली: "मी फक्त एवढेच म्हणेन की सेंजुती, तुमच्या आवाजात उत्कृष्ट रेंज आहे.

'जादू है तेरा' आणि 'अग बाई' हे दोन्ही आपापल्या परीने वेगळे आहेत, आणि मी सांगू इच्छिते की एका गाण्याचं कंम्पोझिशन जतिन-ललित यांनी केले होते आणि दुसरे गाणे अमित त्रिवेदी यांचं. 'गुलाम' आणि 'अय्या' हे दोन्ही अल्बम माझे आवडते अल्बम आहेत."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com