हाय गर्मी! नोरी सोबत थिरकला रणवीर सिंग, व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि नोराचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे
Ranveer Singh
Ranveer SinghDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. 13 मे रोजी प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वी प्रदर्शित झाला आहे, त्यानंतर रणवीर सिंग चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो नोरा फतेही(Nora Fatehi) सोबत डान्स करताना दिसत आहे. (Ranveer Singh Nora Fatehi Video)

Ranveer Singh
Ranveer Singh: प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात!

रणवीर सिंग अलीकडेच टीव्हीवर येत असलेल्या 'डान्स दिवाने ज्युनियर्स'च्या (Dance Deewane Juniours) सेटवर त्याच्या धमाल शैलीत दिसला. त्यांच्या येण्याने रिअॅलिटी शोमध्ये चांगलीच रंगत आली. यादरम्यान अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, मात्र एका व्हिडिओने सोशल मिडियावर बरीच चर्चा घडवून आहे. शोमध्ये जज म्हणून दिसणारी नोरा फतेही या व्हिडिओमध्ये तिच्या हाय गर्मी गाण्याने सेटला आग लावताना दिसत आहे.

त्याचवेळी रणवीर सिंगही तिच्यासोबत ठेका धरताना दिसत आहे. या गाण्यातील दोघांची जुगलबंदी खूपच जबरदस्त रंगली आहे. गाण्याच्या सुरुवातीला नोरा फतेही पहिल्यांदा तिच्या सिग्नेचर स्टेप्स करताना दिसत आहे. त्यानंतर अचानक रणवीर सिंगची एन्ट्री होते. यावेळी दोघांची हटके स्टाइल प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये रणवीर सिंग त्याच असामान्य स्टाईलमध्ये दिसत आहे, तर नोराने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.

Ranveer Singh
'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज, रणवीर विचारतोय मुलगा असेल की मुलगी?

'जयेशभाई जोरदार' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, यात बोमर इराणी (Boman Irani), शालिनी पांडे (Shalini Pandey) आणि रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल, ज्यामध्ये रणवीर सिंग गुजराती व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये गावात मुलींपेक्षा मुलांकडे कसे जास्त लक्ष दिले जाते आणि मुली असताना त्याची हत्या केली जाते असे काहीसे सिन या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विनोदी असला तरी एक गरजेचा सामाजिक संदेशही या चित्रपटातून देण्यात येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com