'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज, रणवीर विचारतोय मुलगा असेल की मुलगी?

हा चित्रपट विनोदी चित्रपट असला तरी एक सामाजिक संदेशही या चित्रपटातून देण्यात येणार आहे
'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज, रणवीर विचारतोय मुलगा असेल की मुलगी?
Jayeshbhai Jordaar Poster Insta/ranveersing

रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या आगामी 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. चित्रपटाचा ट्रेलर 19 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे (Jayeshbhai jordaar trailer release). त्याचबरोबर रणवीर सिंगने आता चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. त्याने या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटाचे हे पोस्टर पाहून तुमचीही उत्सुकता वाढेल. रणवीर सिंगने पोस्टरसोबत दिलेले कॅप्शनही त्याच्या चाहत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी पुरेसे आहे.

Jayeshbhai Jordaar Poster
KL राहुलने झंझावाती शतक केल्यावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

पोस्टरमध्ये रणवीर सिंगच्या मांडीवर मुलाची छायचित्रित प्रतिमा दिसत आहे. तसेच पोस्टरवर 'जयेशभाईंना मुलगा होईल की मुलगी?' असे कॅप्शनही देण्यात आले आहे. त्याचवेळी रणवीर सिंगनेही कॅप्शनमध्ये 'तुला काय वाटते' असे लिहिले आहे. या पोस्टरमध्ये रणवीर सिंग धक्कादायक एक्सप्रेशन देताना दिसत आहे. त्याने मल्टी कलर टी-शर्ट घातला आहे. रणवीर सिंगची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना आणि इतर सेलिब्रिटींनाही आवडली आहे. फिल्ममेकर झोया अख्तरने त्याच्या फोटोवर 'ओएमजी!!! तू गिरगिट आहेस' अशी टिप्पणी केली.

रणवीर सिंग या चित्रपटाचे शूटिंग फेब्रुवारी २०२० मध्येच संपले होते, परंतु कोरोनामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि म्हणून चित्रपटाची रिलज डेट सतत पुढे ढकलली जात होती. अखेर हा चित्रपट आता १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ट्रेलर रिलीज होताच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्टार कास्ट जमतील.

Jayeshbhai Jordaar Poster
Sanjay Dutt : मुलींना इम्प्रेस करण्यासाठी संजय दत्त करायचा अमली पदार्थांचे सेवन

असे असले तरी अद्याप मात्र, चित्रपटाच्या कथानकाबाबत अद्याप फारशी माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे. खुद्द रणवीर सिंगही याबाबत फारसे काही बोलला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट विनोदी चित्रपट असला तरी एक भक्कम सामाजिक संदेशही या चित्रपटातून देण्यात येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी आशा निर्मात्यांना आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com