रणवीर सिंहच्या रूपात बास्केटबॉलला मिळाला सुपरस्टारचा चेहरा

NBAचा ब्रॅंड चेहरा बनल्यानंतर रणवीर एका मुलाखतीत आपला आनंद व्यक्त केला आहे
रणवीर सिंहच्या रूपात बास्केटबॉलला मिळाला सुपरस्टारचा चेहरा
Ranveer Singh NBA Brand Ambassador: Basketball got the face of a superstarInstagram/@ranveersingh

स्टाइल आयकॉन रणवीर सिंह (Ranveer Singh) हे अनेक मोठ्या ब्रॅंडचे अॅम्बेसेडर (Ambassador) आहे. रणवीर सिंह अनेक ब्रॅंडचे प्रमोशन करतो. पण अलीकडेच रणवीर सिंहला एका ब्रॅंडचे अॅम्बेसेडर झाल्यामुळे तो खूप आनंदी आणि उत्साही आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) भारतासाठी यूएस नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) चे ब्रॅंड अॅम्बेसेडर (Ambassador) म्हणून निवड करण्यात आली आहे आहे.

2021 -2022 मध्ये 75 व्या वर्धापनादिनानिमित्त रणवीरला भारतात NBAच्या लीग प्रोफाइलचा प्रचार करण्यास मदत करेल. जिथे तो पडद्यामागून सोशल मिडिया कंटेंट पोस्ट करेल आणि एनबीए खेळाडू आणि दिग्गजांनाही भेटणार आहे. एवढेच नाही तर रानवीर सिंह NBA स्टाइलवर सुद्धा दाखवला जाणार आहे. हे भारतीय चाहत्यांसाठी नवे लाइफस्टाइल इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट आहे.

Ranveer Singh NBA Brand Ambassador: Basketball got the face of a superstar
अखेर ठरलं जानेवारीत आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' थेटरात

* रानवीर सिंहने केला आनंद व्यक्त

NBAचा ब्रॅंड चेहरा बनल्यानंतर रणवीर एका मुलाखतीत आपला आनंद व्यक्त केला आहे, त्याने असे सांगितले आहे की त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याला लहानपणापासूनच बास्केटबॉल आणि एनबीए आवडतात. पुढे त्याने सांगितले की तो नेहमीच संस्कृती, संगीत, फॅशन मनोरंजनाने प्रभावित झालो आहे. एनबीएचे उपायुक्त आणि मुख्य परिचालन अधिकारी मार्क टाटम म्हणाले की, बॉलीवुडचा एक आयकॉन चेहरा मिळाला आहे. रणवीर भारतात आणि जगभरातील अनेक प्लॅटफॉर्मवर चाहत्यांशी संवाद साधेल.

Related Stories

No stories found.