बिग बींच्या 'गुडबाय' चित्रपटातून रश्मिका मंदान्नाची बॉलिवूडमध्ये एंट्री

अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'गुड बाय' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
Rashmika Mandanna Good Bye
Rashmika Mandanna Good ByeInsta/Rashmika Mandanna

Good Bye Release Date: अमिताभ बच्चन, नीना गुप्ता आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'गुड बाय' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'गुडबाय' (Good Bye) चित्रपट यावर्षी 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत पावेल गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोव्हर आणि साहिल मेहता हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गुड बायचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे आणि एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. (Rashmika Mandanna Good Bye)

पोस्टर पाहून असे म्हणता येईल की संपूर्ण कुटुंब एकत्र बसून टीव्हीवर काहीतरी पाहत आहे. अमिताभ आणि रश्मिका सोफ्यावर बसून पॉपकॉर्न खात आहेत, तर नीना गुप्ता इतरांसोबत खाली बसल्या आहेत. पोस्टरवरून अंदाज लावला जाऊ शकतो की प्रत्येकजण टीव्हीवर कोणत्यातरी गेमचा आनंद घेत आहे.

Rashmika Mandanna Good Bye
डोक्यावर टोपी नाकात माईक; हिमेशच्या गाण्यांनी भारताला वेड लावलं

रश्मिका मंदान्नाने गेल्या महिन्यातच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. 24 जून रोजी मुंबईत या चित्रपटाचे शुटींग पुर्ण झाले. यादरम्यान तिने चित्रपट आणि त्यातील कलाकारांबद्दल एक भावनिक पोस्ट शेअर केली. रश्मिकाने सोशल मीडियावर चित्रपटातील कलाकार आणि क्रू यांना टॅग करत भावनिक नोट पोस्ट केली आहे.

या चित्रपटातून रश्मिका मंदान्नाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'पुष्मा: द राइज'मध्ये तिने श्रीवल्लीची भूमिका साकारली होती. रश्मिका रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल'मध्येही दिसणार आहे. ती प्रामुख्याने तेलुगु आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते. तिने 2016 मध्ये किरिक पार्टी या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2018 मध्ये तिचा पहिला तेलगू चित्रपट चालो रिलीज झाला होता.

Rashmika Mandanna Good Bye
Tollywood:हा 'सुपरस्टार'अभिनेता करतोय नॅशनल क्रश रश्मिका मंदानाला डेट

गेल्या महिन्यात चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रश्मिकाने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केल्याबद्दल तिनी त्यांचे आभार मानले. या चित्रपटात आपली निवड केल्याबद्दल तिने विकास बहलचेही आभारही मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com