‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाने नाकारलेत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट

Rashmika Mandanna: सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत रश्मिकाचे नाव आहे.
‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदनाने नाकारलेत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट
Rashmika Mandanna|Dainik Gomantak

‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Madanna) सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. रश्मिका ‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनसह झळकली होती. या चित्रपटातील रश्मिकाच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडले आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे रश्मिकाच्या मानधनात वाढ झाली आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रश्मिका मंदनाचे नाव आहे. परंतु, रश्मिकाने अनेक सुपर हिट चित्रपट नाकारल्यामुळे, तिने नव्या संधींना पाठ देखील दाखवली आहे. (Rashmika Madanna Latest News)

‘पुष्पा’ या चित्रपटासाठी रश्मिकाने तब्बल 3 कोटी रुपये मानधन आकारले आहेत. शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटामुळे रश्मिका चर्चेत असते. नुकताच शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा ‘जर्सी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट सुपर हिट ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या भूमिकेसाठी आधी रश्मिकाला विचारण्यात आले आहे.परंतु रश्मिकाने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. शाहिद कपूरचा ‘जर्सी’ (Jersey) हा चित्रपट दक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता.

Rashmika Mandanna|
लईच भारी! अनुष्काने विराटसह शेअर केला सुंदर फोटो

रश्मिका मंदानाने चित्रपटाला (Movie) नाही म्हणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या अभिनेत्रीने दिग्दर्शक शंकरचा चित्रपट 'RC15' हा चित्रपट नाकारला आहे. रश्मिकाच्या नकारानंतर या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीला कास्ट करण्यात आले. तसेच रश्मिकाने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा एक आगामी चित्रपट देखील नाकारला आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटामध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

* रश्मिका बॉलिवूड पदार्पण करणार!

सध्या रश्मिका मंदाना मनालीमध्ये रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) आगामी 'एनिमल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रश्मिका मंदाना आगामी चित्रपट 'मिशन मजनू' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच अमिताभ बच्चन यांच्यासह 'गुडबाय' चित्रपटात देखील ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com