Rashmika- Rishab Shetty: रश्मिका आणि कांतारा फेम ऋषभमध्ये कसलं भांडण सुरूय...एकमेकांवर करतायत आरोप

साऊथची अभिनेत्री रश्मिका आणि कांतारा फेम अभिनेता दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांच्यात जोरदार वाद सुरू आहेत
Rishab Shetty 
Rashmika Mandanna
Rishab Shetty Rashmika MandannaDainik Gomantak

साऊथची गोड अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला ओळखत नाही असा चित्रपट रसिक भारतात शोधुन सापडणार नाही. भले एखादा प्रेक्षक साऊथचा नसेल पण डब केलेल्या चित्रपटातून तो रश्मिकाच्या प्रेमात पडलेला असतो.आपल्या मोहक अदांनी सतत चर्चेत असणारी ही क्यूट अप्सरा सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे.

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री 'रश्मिका मंदान्ना' आणि 'कांतारा' चित्रपटाचा दिग्दर्शक 'ऋषभ शेट्टी' यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघांचेही एकमेकांचे नाव न घेता आरोप सुरू आहेत. या भांडणामागचं कारण अजुनतरी कळलेलं नाही.

 'कांतारा' चित्रपटातून जगभरात नावाजला गेलेला अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने 2018 साली 'किरिक पार्टी' नावाचा चित्रपट बनवला होता. या चित्रपटातून रश्मिका मंदन्नाने अभिनय विश्वात पदार्पण केले आणि यश मिळवले.

या चित्रपटाला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि यातुनच दोघांच्या वादाला सुरूवात झाली होती. चित्रपटाला 6 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ऋषभने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रश्मिकाला टॅग केले नाही तेव्हाच या वादाची सुरूवात झाली होती.

यानंतर एका मुलाखतीत रश्मिकाने चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचे नाव न घेता सगळ्यांचे आभार मानले

रश्मिका मंदान्नाने तिच्या करिअरबद्दल बोलताना ऋषभ शेट्टी आणि रक्षित शेट्टी यांची नावे घेतली नाहीत. खरंतर ही नावं घेणं अपेक्षित होतं. रश्मिकाने काही आठवड्यांपूर्वी किरिक पार्टी या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशाबद्दल सांगितले होते,

परंतु यावेळी तिने प्रॉडक्शन हाऊसचे नाव घेतले नाही. हा चित्रपट बनवणाऱ्या ऋषभचाही उल्लेख केला नाही. अनेक चाहत्यांनी याला अपमानास्पद म्हटले आणि रश्मिकाच्या या वागण्यावर टीका केली.

ऋषभ शेट्टीने रश्मिका मंदान्नाच्या कमेंटवर आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत बोलताना ऋषभ शेट्टी म्हणाला, ''तुम्ही वाईट वाटुन वाटुन घेऊ नका .आम्ही अनेक कलाकार आणले आहेत, आणि आम्हाला अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी संधी दिली आहे, त्यामुळे ते त्याच यादीत राहतील''

Rishab Shetty 
Rashmika Mandanna
Shah Rukh Khan At Film Festival: किंग खानच्या नावे नवा खिताब,रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला केलं जाणार सन्मानित

 रश्मिकाने उल्लेख टाळल्यानंतर साहजिकच ऋषभला वाईट वाटणं साहजिक होते तो म्हणाला "मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मुख्य कलाकारांची निवड करतो. आणि मला 'या' प्रकारातील अभिनेत्री आवडत नाहीत. मी नवीन लोकांसोबत काम करण्यास प्राधान्य देतो कारण ते कोणत्याही अडथळ्याशिवाय येतात".

ऋषभच्या या घणाघाती टीकेवर आता रश्मिका काय प्रतिक्रिया देणार हे पाहुया.कारण हा वाद इतक्यात संपेल असं वाटत नाही. रश्मिका आणि ऋषभ दोघेही त्यांच्या करिअरच्या शिखरावर आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया लक्ष वेधुन घेतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com