गोव्यामध्ये पार पडणार रसिका-आदित्यचं डेस्टिनेशन वेडिंग

आता माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील लवकरच बॉयफ्रेंड आदित्य गोवा बिचवर
गोव्यामध्ये पार पडणार रसिका-आदित्यचं डेस्टिनेशन वेडिंग
Rasika sunil and Aditya destination wedding to be held in GoaDainik Gomantak

झी मराठी वाहिनावरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको (Majhya Navryachi Bayko) खुप गाजली त्यातील प्रत्येक कलाकार रसिकांच्या घराघरात पोहचला. या मालिकेमध्ये विशेष पात्र गाजले ते शनायाचे (Shanaya). ती या मालिकेतील चर्चेचा विषय असायची. आता माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील लवकरच बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्नबंधनात अडणार आहे. तिचा साखरपुडाही झाला आहे.

नुकाताच रसिकाने तिच्या प्रीवेडींग शूटचा एक शॉर्ट व्हि़डीओ तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये गोव्याच्या समुद्रकिनारी (Goa Beach) दोघांनीही त्यांच्या प्रीवेडींग शूटची झलक दाखविली आहे. आणि गोव्याच्या बिचहून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लवकरच रसिका-आदित्य लग्नबंधात अडकणार असून त्यांचं लग्न कुठे होणार असा प्रश्न त्यांच्या फॅन्सला पडला आहे. नुकताच रसिकाने एक फोटो पोस्ट करून त्यावरील कॅप्शनवरून आणि त्यावर तिने दिलेल्य़ा हॅशटॅग वरून रसिका-आदित्यचं लग्न एक डेस्टिनेशन वेडिंग असणार आणि हे लग्न गोव्यात पार पडणार असल्याची हिंट तिने चाहत्यांना दिली आहे.

Rasika sunil and Aditya destination wedding to be held in Goa
'चिकणी चमेली' या गाण्यावर थिरकला रणवीर सिंग, पहा व्हिडिओ

रसिकाने दोघांनाचाही एक रोमॅण्टिक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत, “Do they know that we know they don’t know? असं कॅप्शन देत त्यावर #goa #beach #raskywedsadi #destination या प्रकारचे हॅगटॅग वापरले आहेत. यावरूनचं या दोघांचही लग्न गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार असा अंदाज लावला फॅन्सकडून लावला जातो आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com