‘माझ्या नवऱ्याची बायको’मधल्या शनायाच्या आयुष्यात आला खरा खुरा गॅरी

वृत्तसंस्थ
मंगळवार, 5 जानेवारी 2021

'झी मराठी' वरच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे.

मुंबई :  'झी मराठी' वरच्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनायाची भूमिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेली अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे रसिकाने तिच्या आयुष्यातील मिस्टर स्पेशल बरोबरचा फोटो शेअर केलाय. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रसिकानी तिचा जवळचा मित्र आदित्य बिलागीसोबतचे फोटो शेअर केलेत. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला. ‘दोन हजार एक किस.. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या वर्षभरात अनेक वाईट घटना घडल्या असल्या तरी आनंदी राहण्यासाठीदेखील या वर्षानी मला एक कारण दिलंय’, असं कॅप्शन या फोटोंना दिलंय. ते कारण तू आहेस, असं म्हणत रसिकाने आदित्यबरोबरचा फोटो शेअर केलाय. 

दोन वर्षांपूर्वी रसिकाने सुनिल झी मराठीवर अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून अॅक्टींगच्या शिक्षणासाठी ती लॉस एंजिलिसला गेली होती. तिथेच तिची आदित्यशी बिलागीशी ओळख झाली. लॉस एंजिलिसमधून अॅक्टींगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा ‘माझ्या नवऱ्याची बायको’शी जुळली गेली. तब्येतीच्या कारणामुळे ईशा केसकर नी ही मालिका सोडली होती.

संबंधित बातम्या