Varun Dhawan Wedding : जाणून घ्या वरून धवनची पत्नी नताशा आहे तरी कोण? 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

बॉलिवूड अभिनेता वरून धवन बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करत आहे.

बॉलिवूड अभिनेता वरून धवन बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्न करत आहे. यांचे लग्न अलिबाग मधील एका रिसॉर्ट मध्ये होत आहे. वरुण धवनच्या लग्नात त्याची शालेय मैत्रीण जोया मोरानी आणि इतर मित्र टीम वीर आणि टीम हॅम्टीचे टी-शर्ट घालून सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच यावेळेस मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहरदेखील स्पॉट झाले. 

वरून धवनच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर चांगलेच व्हायरल होत आहेत. वरूनची मैत्रीण जोया मोरानीने यावेळेस टीम वीरचा शर्ट घातल्याचे पाहायला मिळाले. तर वरूण धवनच्या इतर मित्रांनी टीम हॅम्टीचा टीशर्ट घातला होता. त्यामुळे वरूनचे मित्र काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून, ते सगळे वरूनच्या लग्नासाठी चांगलेच उत्साहित दिसले. तसेच बॉलिवूड इंडस्ट्री मधील फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि निर्माता करण जोहर देखील वरून धवनच्या लग्नाच्या ठिकाणी पोहचल्याचे पाहायला मिळाले. 

वरुण धवन आणि नताशा दलाल हे लहानपणापासूनच एकमेकांना ओळखतात. हे दोघेही एकाच शाळेत शिकलेले आहेत. व ते खूप वर्षांपासून चांगले मित्र आहेत. नताशा दलाल ही फॅशन डिझायनर आहे. नताशाने 2013 मध्ये न्यूयॉर्क मधील फॅशन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी घेतलेली आहे. नताशाचे वडील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर मागील वर्षापासून वरून धवन आणि नताशा दलाल हे लग्न करणार असल्याच्या वार्ता मिळत होत्या. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या दोघांनी आपले लग्न पुढे ढकलल्याची चर्चा सुरु होती.        

संबंधित बातम्या