या कारणामुळे होणार नाही राजीव कपूर यांचा चौथा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

गेली काही वर्षे कपूर कुटुंबासाठी चांगली नव्हती. राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचे 2018 मध्ये निधन झाले. 2020 च्या सुरुवातीलाच राज कपूर यांची मोठी मुलगी रितू नंदा यांचे निधन झाले.

नवी दिल्ली: राज कपूर यांचा लहान मुलगा राजीव कपूर यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. काल मंगळवारी राजीव कपूर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यात संपूर्ण कपूर कुटुंबाखेरीज बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हजर होते.

माहितीनुसार राजीव कपूरचा चौथा होणार नाही. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. "सध्याच्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव, दिवंगत अभिनेते  राजीव कपूर यांचा चौथा होणार नाही. त्यांच्या आत्माला शांती लाभो. संपूर्ण राज कपूर कुटुंब या दु: खामध्ये सहभागी आहे," असे नितू कपूरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

गेली काही वर्षे कपूर कुटुंबासाठी चांगली नव्हती. राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज कपूर यांचे 2018 मध्ये निधन झाले. 2020 च्या सुरुवातीलाच राज कपूर यांची मोठी मुलगी रितू नंदा यांचे निधन झाले. त्यानंतर एप्रिलमध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. आणि आता राजीव कपूर यांच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

राज कपूरचा सर्वात धाकटा मुलगा राजीव कपूर यांनी काल मंगळवारी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

राजीव कपूर यांचा जन्म 25 ऑगस्ट 1962 रोजी मुंबई येथे झाला होता. राजीव यांनी सहाय्यक दिग्दर्शक बनून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. सर्व प्रथम, ते राहुल रावेलचे सहाय्यक दिग्दर्शक होते, आरके बॅनरखाली बनविलेले बिवी ओ बीवी चित्रपटाचे दिग्दर्शक होते. यानंतर स्वत: राज कपूर यांनी त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून स्वत: कडे ठेवले होते. अभिनेता म्हणून त्यांनी एक जान हैं हम (1983) या चित्रपटातून पदार्पण केले. राम तेरी गंगा मैली (1985) चित्रपटातून राजीव कपूर यांना मोठी ओळख मिळाली होती. आसमान, लवर ब्वॉय, जबरदस्त, हम तो चले परदेस, अंगारे और नाग नागिन ही त्यांची प्रमुख चित्रप़ट आहेत.

<

संबंधित बातम्या