गोव्यात होणाऱ्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरु

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

गोव्यात होणाऱ्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे.

पणजी: गोव्यात होणाऱ्या ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे. यावर्षीचा इफ्फी १६ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडणार असून या महोत्सवात २२४ चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.  आशिया आणि भारतातील उत्कृष्ट प्रीमिअर या इफ्फीमध्ये पाहता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

महोत्सवात ४७ चित्रपट इंडियन पॅनोरमा विभागात दाखविले जाणार आहेत. २६ फिचर आणि २१ नॉनफिचर चित्रपट असणार असल्याचेसुद्धा ते म्हणाले. यावर्षीच्या इफ्फीसाठी १००० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. दरवर्षी या महोत्सवाचे नियोजन केंद्रीय माहिती आणि प्रसारण खाते, गोवा मनोरंजन संस्था, गोवा आणि चित्रपट महोत्सव संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

‘इफ्फी’ १६ जानेवारीपासून 
राज्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) कोविड महामारीमुळे पुढील वर्षीच्या जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. हा महोत्सव येत्या १६ जानेवारीपासून आभासी पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. या महोत्सवासंदर्भातची सविस्तर माहिती गोवा मनोरंजन संस्थेतर्फे लवकरच पत्रकार परिषद घेऊन दिली जाईल असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या