'कुली नं १' रिमेकचे ट्रेलर बघून चाहते चांगलेच तापले; म्हणाले, गोविंदा आणि कादर खान जोडीला पर्यायच नाही

दैनिक गोमन्तक
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी केलेल्या 'कुली नं. १' या सिनेमाचा २५ वर्षांनंतर रिमेक येत आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं शीर्षक तेच ठेवण्यात आले असून दिग्दर्शनही डेव्हिड धवनच करत आहेत. 

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी केलेल्या 'कुली नं. १' या सिनेमाचा २५ वर्षांनंतर रिमेक येत आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे याचं शीर्षक तेच ठेवण्यात आले असून दिग्दर्शनही डेव्हिड धवनच करत आहेत. 

या सिनेमाची पटकथाही जवळपास जुनीच ठेवण्यात आली असून वरूण धवन याने गोविंदाची भूमिका साकारली आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात सारा अली खान, परेश रावल, जावेद जाफरी, आणि राजपाल यादव या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात परेश रावल यांनी साराच्या पित्याचे पात्र साकारले आहे. रावल साकारत असलेले पात्र याआधी कादर खान यांनी केले आहे.

हे सगळं ठीक आहे. मात्र, नवीन चित्रपटाच्या ट्रेलरलाच लोकांनी ट्रोल केले असून कादर खान आणि गोविंदा यांच्या जोडीला कोणीही रिप्लेस करू शकत नाही, असे प्रतिक्रिया उमटत आहे. ९०दीत गोविंदा आणि कादर खान यांची जोडी अतिशय पसंत केली जात होती. या जोडीने कुली नं १, राजा बाबू, हीरो नं. १, यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. आता वरूण आणि परेश रावल यांच्या जोडीने ती जादू पुन्हा एकदा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, असे होवू शकले नाही. ट्रेलर येताच प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देण्यस सुरूवात केली. यावेळी वरूण धवन गोविंदाला कधीच रिप्लेस करू शकत नाही अशा थेट कमेंट लोकांनी केल्या आहेत. 

हा चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांनी तिखट प्रतिक्रिया दिल्याने चित्रपट नेमका हिट होतो की नाही हे आता चित्रपट आल्यावरच कळू शकेल.  

संबंधित बातम्या