प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका; प्रकृती चिंताजनक असल्याची पत्नीची माहिती

गोमंतक ऑनलाईन टीम
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

प्रसिद्ध नृत्य़ दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई- प्रसिद्ध नृत्य़ दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे. 

रेमो यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर असून याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, 'रेमोच्या शरीरात एक छिद्र पडले होते. डॉक्टरांनी त्यांची अॅंजिओग्राफी केली आहे. त्यांच्यासाठी कृपया प्रार्थना करा.  ते आता अतिदक्षता विभागात असून पुढील 24 तास अधिक महत्वाचे आहेत. 
 
46 वर्षीय रेमो डिसूझा यांनी स्ट्रीट डान्सर, 3डी, एबीसीडी, एबीसीडी2, फ्लाइंग जट यांसह अनेक सिनेमांचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. याशिवाय रेमो यांनी काही डान्स रियालिटी शोजचे परीक्षणही केले आहे. यात झलक दिखलाजा, डान्स इंडिया डान्स,  डान्स प्लस आदि कार्यक्रमांचा समावेश आहे.   

संबंधित बातम्या