Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ, ड्रग्ज पुरवल्याचा आरोप

Rhea Chakraborty Latest News: बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढल्या आहेत. रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज पुरवल्याचा आरोप एनसीबीने केला आहे.
Bollywood actress Rhea Chakraborty
Bollywood actress Rhea ChakrabortyDainik Gomantak

सुशांत सिंह हत्या (Sushant Singh Rajput) प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अडचणी वाढल्या आहेत. रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज पुरवल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. एनसीबीच्या आरोपपत्रात रिया आणि तिचा भाऊ शौविक यांची नावे आहेत.

एनसीबीनचा दावा

एनसीबीने दावा केला आहे की सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने तिचा भाऊ शौविकसह इतर आरोपींकडून अनेकदा गांजा विकत घेतला होता. तो अभिनेता सुशांत सिंगला दिला होता. सुशांत मृत्यू प्रकरणातील 35 आरोपींविरुद्ध एनसीबीने (NCB) नुकतेच एनडीपीएस कोर्टात आरोपांचा मसुदा दाखल केला होता, ज्याची सुनावणी मंगळवारी झाली.

सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू कसा झाला याचा तपास आधीच सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. तर एनसीबी या प्रकरणामध्ये ड्रग्जच्या एंगलमधुन तपास करत आहे. सुशांतच्या मृत्यूमागे ड्रग्जचा काय संबंध, एनसीबी याचा तपास करत आहे.

आरोपपत्रात रियाचा भाऊ शौविक ड्रग्ज विकणाऱ्याच्या संपर्कात होता, असे नमूद करण्यात आले आहे. तो ऑर्डर द्यायचा, जे सुशांत सिंग राजपूतच्या घरी पाठवले जात होते. आरोपांनुसार, सर्व आरोपींनी मार्च 2020 ते डिसेंबर दरम्यान एकमेकांसोबत किंवा हाय सोसायटी आणि बॉलीवूडमध्ये ड्रग्जची खरेदी, विक्री आणि वितरण करण्यासाठी गुन्हेगारी कट रचला.

आरोपींनी मुंबई (Mumbai) महानगर प्रदेशात अंमली पदार्थांच्या तस्करीला आर्थिक मदत केली आणि गांजा, चरस, कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचेही नमूद करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com