जीममधून बाहेर पडणाऱ्या रियाचा फोटोग्राफरला कूल रिप्लाय

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत ने आत्महत्या केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. एवढेच नाही तर सुशांतची मैत्रीण रीया चक्रवर्ती वर सुशांतसिंगच्या मृत्यूबद्दल अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. व याप्रकरणी रिया चक्रवर्तीला तुरुंगातही जावे लागले होते. मात्र त्यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा आपले जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत ने आत्महत्या केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. एवढेच नाही तर सुशांतची मैत्रीण रीया चक्रवर्ती वर सुशांतसिंगच्या मृत्यूबद्दल अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. व याप्रकरणी रिया चक्रवर्तीला तुरुंगातही जावे लागले होते. मात्र त्यानंतर आता अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा आपले जीवन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकतेच रिया चक्रवर्ती एका जिममधून बाहेर येताना दिसली. यावेळी रियाला पाहताच फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. फोटोग्राफरने रियाला तिच्या प्रकृतीविषयी विचारले असता, यावेळेस रियाने दिलेल्या उत्तरावर चांगलीच चर्चा होत आहे.

सेलिब्रेटींच्या ट्विटर वॉरनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया

अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिया जिममधून बाहेर पडताना दिसत आहे. बऱ्याच दिवसानंतर रियाला पाहून तेथे उपस्थित असलेल्या काही फोटोग्राफर यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. व यावेळेस एका फोटोग्राफरने रियाला तिच्या प्रकृतीविषयी विचारले. फोटोग्राफरने रियाशी बोलताना ''हॅलो रिया मॅम केसे हो,'' असे म्हणत तिच्याविषयी विचारपूस केली. यावर रियाने देखील अतिशय शांतपणे उत्तर देत आता आपण ठीक असल्याचे सांगितले.

 गोव्यातील कार्निव्हल रद्द करण्याची मागणी

रिया चक्रवर्ती जिम मधून जात असताना तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीही तीच्याबरोबर होता. दरम्यान, यापूर्वी रिया बऱ्याच वेळा तिचा दिवंगत मित्र सुशांतसिंग राजपूतसोबत वर्कआउटला जात होती. तर, मागील वर्षाच्या 14 जून 2020 रोजी सुशांतसिंग राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समोर आले होते.    

संबंधित बातम्या