Rinku Sharma Murder: प्रकरणावर कंगनाचे ट्विट; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना म्हणाली...

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

प्रत्येक प्रकरणात आपले वक्यव्य दोणारी अभिनेत्री कंगना रनौतने ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.

नवी दिल्ला: दिल्लीतील मंगोलपुरी येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्माच्या हत्येनंतर परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे. रिंकू शर्मा खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक प्रकरणात आपले वक्यव्य दोणारी अभिनेत्री कंगना रनौतने ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.

"प्रिय केजरीवाल जी, मला आशा आहे की तुम्हीसुद्धा रिंकू शर्माच्या कुटूंबाला भेटून त्यांची साथ द्याल. तुम्ही राजकारणी आहात, तूम्ही राजकीय नेते आहात, तेव्हा मला आशा आहे की, तुम्हीही स्टेट्समैन व्हाल," अरविंद केजरीवाल यांच्यावर कंगनाचे हे ट्विट आहे. कंगनाने केजरीवाल यांचे 2015 चे ट्विट शेअर केले. ज्यात त्यांनी दादरीमध्ये मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या इखलाखच्या घरी भेट देण्याचे सांगितले होते.

रिंकू शर्मा खून प्रकरणावर कंगनाने आणखी एक ट्विट केले होते. “रिंकू शर्माच्या वडिलांच्या वेदनेची जाणीव करा आणि आपल्या मुलांचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा विचार करा ... एखाद दिवशी जेव्हा एखादा हिंदू जय श्री राम म्हटल्यावर मारला जाईल." असे ट्विट कंगनाने केले होते.  

रिंकू शर्माच्या हत्येनंतर संपूर्ण देशात राजकारण तापले असल्याची माहिती आहे. बरेच लोक या प्रकरणाला जातीय विषय म्हणून संबोधत आहेत. कारण, रिंकू शर्मा राम मंदिरासाठी देणगी गोळा करीत होता आणि राम यात्रेशी जुळला होता. मात्र, अरविंद केजरीवाल यांना सल्ला दिल्यामुळे कंगनालाही आता ट्रोल केले जात आहे.

दरम्यान बुधवारी रात्री दिल्लीच्या मंगोलपुरी भागात बजरंग दलाचा कार्यकर्ता रिंकू शर्मा याला काही लोकांनी ठार केले. प्रदेश भाजपा अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी रिंकू हत्येचा निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रिंकूच्या कुटुंबीयांना दिलासा देताना त्यांनी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली.

 

 

संबंधित बातम्या