Rishi Kapoor Birth Anniversary: ही प्रसिद्ध गाणी आजही आहेत लोकांच्या ओठांवर

ऋषी कपूर ( Rishi Kapoor) यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत.
Rishi Kapoor Birth Anniversary: ही प्रसिद्ध गाणी आजही आहेत लोकांच्या ओठांवर
Rishi KapoorDainik Gomantak

1970-80 च्या दशकातील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेते ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. आज त्यांच्या वाढदिवसनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे त्यांचे काही प्रसिध्द चित्रपट (Movies) आजही प्रेक्षकांच्या (Audience) मनात घर करुन आहेत. 30 एप्रिल 2020 मध्ये ऋषि कपूर यांचे एका दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलीवुडमधील (Bollywood) एक मोठा तारा निखळला आहे. त्यांचे जाणे त्यांच्या अनेक चाहत्यांच्या (Fans) मनाला चटका लावून जाणारे होते. आज सुद्धा ऋषी कपूर यांचे चित्रपट (Movies) आणि गाणी (Song) अनेकांच्या ओठांवर आहेत. चला तर मग जणून घेवूया त्यांची प्रसिद्ध गाणी...

* हम तुम एक कमरे में (1973)

हे गाणं ऋषी कपूर यांच्या प्रसिद्धा गाण्यापैकी एक आहे. या गाण्याला लक्ष्मीकांत - प्यारेलाल यांनी संगीत दिले. तर हे गाणं शैलेंद्र सिंह आणि लता मंगेशकर यांनी गायले.

* एक मैं और एक तू, दोनो मिले इस तरह (1975)

सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला खेल खेल मे या चित्रपटामधील हे एक गाणं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान संगीत दिग्दर्शक म्हणून ओळखल असलेले आर डी बर्मन यांनी हे गाणं तयार केले, तर गुलशन बावरा यांनी हे गीत लिहिले. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं गायले.

* ओम शांती ओम (1980)

हे गाणं कर्ज या चित्रपटातील आहे. 1980 च्या दशकातील बॉलीवूडमधील आयकॉनिक गाण्यापैकी एक आहे. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी या गाण्याला संगीत दिले. हे गाणं आजसुद्धा चाहत्यांच्या मनावर राज करत आहे.

* सागर किनारे दिल ये पुकारे ( 1985)

रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर चित्रपाटातील हे गाणं आहे. हे गाणं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायले आहे. या गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

* सोचेंगे तुम्हे प्यार (1992)

दिवाना या चित्रपटामधील हे गाणं आहे. हे गाणं कुमार सानू यांनी गायले आहे. तर नदीम-श्रावण या जोडीने या गाण्याला संगीत दिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com