ऋषि कपूर यांना आवडले नव्हते रणबीच्या 'रॉकस्टार' चित्रपटातील गाणे

रॉकस्टार या चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, ए आर रहमानने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर रणवीर कपूर, इम्तियाज अली आणि संजना सांघी यांची झालेल्या सांभाषणाचा व्हिडिओ शेअर केला.
ऋषि कपूर यांना आवडले नव्हते रणबीच्या 'रॉकस्टार' चित्रपटातील गाणे
ऋषि कपूर यांना रणबीर कपूरच्या "रोकस्टार" चित्रपटातील एकही गाणे आवडले नाही, ए.आर. रहमानचा मोठा खुलासा, Dainik Gomantak

दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'रॉकस्टार' (Rockstar) चित्रपटाला 10 वर्ष पूर्ण झाली आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातूनच रणबीरने चित्रपट क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटाच्या 10 वर्षानंतर दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांना रॉकस्टार चित्रपटाचे एकही गाणे आवडले नाही, असा खुलासा ए आर रहमानने केला आहे.

ए आर राहमानने यूट्यूबवर व्हिडिओ शेअर केला

रॉकस्टार चित्रपाटाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, ए आर रहमानने यूट्यूबवर रणबीर कपूर, इम्तियाज अली आणि संजना सांघी यांच्यासोबत लाईव्ह सेशनचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये प्रत्येकजन त्यांच्या चित्रपटतील काही दिवसांचा अनुभव ताज्या करतांना दिसले. व्हिडिओमध्ये ए आर रहमान काश्मीरमध्ये रॉकस्टारच्या शूटिंगबद्दल सांगितले, जिथे रॉकस्टारचे गाणे शूट केले जात होते आणि त्याने खुलासा केला की शूटिंगदरम्यान त्याने लोकांना विचारले की त्यांना हे गाणे आवडली आहे का. दिग्दर्शक इम्तियाज अलीनेही आपले म्हणणे मांडले की प्रत्येकाला ते गाण आवडले. मी म्हणतो की आपल्या सर्वांनाहे गाण आवडल पण तुम्ही कधी हे गाण कोणासाठी वाजवले आहे का? यावर ए आर रहमानने सांगितले की, मी रणबीरच्या वाडिलांसामोर हे गाण वाजवले पण त्यांना एकही गाणे आवडले नाही आणि मलाही ते अपेक्षित होते कारण मला माहिती होते कारण सर्व काही खूप गुंतागुंतीचे होते.

ऋषि कपूर यांना रणबीर कपूरच्या "रोकस्टार" चित्रपटातील एकही गाणे आवडले नाही, ए.आर.  रहमानचा मोठा खुलासा,
तेलगू रिमेक Drushyam 2 चा टीझर रिलीज...

पुढे त्यांना विचारण्यात आले की त्यांना एकही गाण का आवडले नाही? तेव्हा ऋषि कपूर म्हणाले होते की, त्यांना गाण्यातील यमक समजले नाहीत. हे एकल्यावर रहमान म्हणाला की मी दुसऱ्या गाण्यावर काम करेल. यानंतर नादान परिदे हे गाण तयार झाले. ही अतिशय महत्वाची टिपणी होती, त्यानंतर या चित्रपटाच्या गाण्याचे स्वरूप बदलले. रॉकस्टार हा चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होतो. या चित्रपटमधील सूफी,नादान परिंदे, तुम हो, और हो और हो ही गाणी सुपरहीट ठरली. ही गाणी त्या वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीत अल्बमपैकी एक होता. या चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत नर्गिस फाखरी मुख्य भूमिकेत होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com