'लव्ह इज पॉवर' म्हणत रिया चक्रवर्तीने केला जुना फोटो शेअर

दैनिक गोमंतक
रविवार, 28 मार्च 2021

रिया चक्रवर्तीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो  शेअर केला आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेली  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होत असल्याचे  दिसते आहे. रिया चक्रवर्तीने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो  शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची मैत्रीण चित्रपट  निर्माता निधी परमार हिरानंदानी रियासोबत असल्याचे दिसते आहे. रियाने हा फोटो  शेअर करत, "प्यार एक ऐसा फेब्रिक है, जो कभी भी फेड नहीं पड़ता है, कोई फर्क नहीं पड़ता आप उसे कितनी भी बार विपत्ति और शोक के पानी में धो लें"  असे कॅप्शन देऊन,  त्यासोबत लव्ह इज पावर असा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. 

 रिया चक्रवर्ती ( Rhea chakraborty)  यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सुमारे 15 आठवडे जुना आहे. हे फोटो  निधी परमार हिरानंदाने 13 डिसेंबर 2020 रोजी त्यांच्या  इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. त्यावेळी हे चित्र चर्चेत आले नव्हते, परंतु आता हा फोटो जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान  सुशांत प्रकरणाच्या नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे  रिया चक्रवर्ती सोशल मीडियापासून दूर गेली होती. पण आता ती हळूहळू इंस्टाग्रामवर कमबॅक करताना दिसते आहे. यापूर्वी, रियाने 8 मार्च रोजी तिच्या आईसाठी एक विशेष पोस्ट पोस्ट केली होती. पोस्टमध्ये आईचा हात धरून रिया  चक्रवर्ती स्वतः दिसली. 

66 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर; इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता तर तापसी पन्नूला...

सुशांतसिंग (Sushantsingh Rajput) मृत्यू प्रकरणात माध्यमांतून झालेल्या अप्रचारामुळे मध्यंतरी तिने मुख्यप्रवाहापासून दूर राहणे पसंत केले होते. मात्र आता ती लवकरच चित्रपटसृष्टीत सुद्धा  दिसणार आहे. या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार अशी माहिती आहे. त्यामुळे आता पप्रेक्षकवर्गाकडून  रिया चक्रवर्तीला कसा प्रतिसाद मिळतो हे आता आगामी काळातच समजणार आहे. 

संबंधित बातम्या