रिया साकारणार आधुनिक महाभारतात द्रौपदीची भूमिका

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

रिया लवकरच महाभारत या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरु आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) सोशल मिडियावर (Social media) चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी 'द टाइम्स 50 मोस्ट डिजायरेबल वुमन 2020' (The Times 50 Most Desirable Woman)  च्या यादीमध्ये रिया चक्रवर्तीचा नंबर पहिला होता. अंतर्गत निर्णायक मंडळींनी आणि ऑनलाइन मतदानात मिळालेल्या मतांवर हा निर्णय घेतला आहे. दरम्यान रिया लवकरच महाभारत (Mahabharata) या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा सुरु आहे. (Riya will play the role of Draupadi in the modern Mahabharata)

या सिनेमामध्ये महाभारत ही कथा आणि द्रौपदीचं (Draupadi) पात्र हे वेगळ्या पध्दतीने साकारण्यात येणार आहे. मात्र त्याची कथा आत्ताच्या काळावर आधारित असणार आहे. रियाला द्रौपदीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले आहे. सध्या रिया या भूमिकेवर विचार करत आहे. याबाबत फक्त चर्चा सुरु आहे.

राखी म्हणाली, रामदेव बाब हाच मोठा कोरोना

बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनांनतर रियाला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत होते. मात्र आता रियाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसत आहे. रिया आता लोकांकडे काम मागताना दिसत आहे. जेणेकरुन येत्या काळात ती पुढे प्रगती करु शकेल.

'चेहरे' या सिनेमातून रिया लवकरच पुन्हा एकदा नव्या जोशाने पुनरागमन करणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन,(Amitabh Bachchan), अन्नू कपूर, इमरान हशमी,( Imran Hashmi) रघुवीर दास हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एप्रिल महिन्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र  कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित बातम्या