सना खान नंतर अजून एका कलाकाराने धर्मासाठी सोडला अभिनय

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

बॉलिवूड आणि टीव्ही मध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या धर्मामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे अभिनयाच्या जगाला निरोप दिला आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही मध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या धर्मामुळे आणि वैयक्तिक कारणांमुळे अभिनयाच्या जगाला निरोप दिला आहे. गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री सना खानने इस्लामसाठी चित्रपट जगताचा संसार सोडला होता. त्यातच आता टीव्ही अभिनेता साकीब खाननेही धर्माचा हवाला देऊन सिनेजगताला सोडचिट्ठी देण्याची घोषणा केली आहे. (Roadies fame Sakib Khan quits acting for Islam)

साकीब खान ‘रोडीज’ (Rodies)या रिऍलिटीशोचा एक भाग आहे. साकीब खानने स्वत: चे एक छायाचित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले पाहायला मिळते आहे. तसेच या छायाचित्रासह त्याने एक मोठी  पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये 'आपण रस्ता चूकत होता आणि आपल्या धर्माच्या तत्त्वांच्या विरोधात जात होतो.' असे साकीब खानने म्हटले आहे. त्यामुळे  भविष्यात तो मॉडेलिंग किंवा अभिनय करणार नसल्याचे स्पष्ट होते आहे. पुढे त्याने चाहत्यांना असेही सांगितले की काम करण्यासाठी इतर अनेक क्षेत्रांचे पर्याय आपल्यापुढे आहेत. 

साकीब खानने (Sakib Khan) आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "बंधू आणि भगिनींनो, आशा आहे की तुम्ही सर्व चांगले असाल. आजची पोस्ट अभिनयाचा (Acting) संसार सोडण्याच्या घोषणेशी निगडित आहे. भविष्यात मी कोणतीही मॉडेलिंग आणि अभिनय करणार नाही."  तसेच पुढे काही धार्मिक मुद्द्यांची दखल देत त्याने आपण या क्षेत्रातून रजा घेणार असल्याचे सांगितले. 

संबंधित बातम्या