Alia-Ranveer च्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट आउट

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: रणवीर सिंह आणि आलिया भट्टच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
Rocky Aur Rani Ki Prem Kahani:
Rocky Aur Rani Ki Prem Kahani:Dainik Gomantak

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करण जोहरने इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची (Movie) निर्मिती करण्यात येणार आहे. रॉकी आणि राणीच्या प्रेमावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना एक रोमॅंटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani:
Bipasha Basu Baby: बिपाशा बसू अन् करण सिंग ग्रोव्हरच्या मुलीचे ठरले नाव

करण जोहरने (Karan Johar) एक खास पोस्ट शेअर करत लिहिले आहे, सात वर्षांनंतर पुनरागमन करतो आहे. माझ्या सिनेसृष्टीतील प्रवासात मला एकापेक्षा एक चांगल्या कलाकारांसोबत काम करता आले आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे कथानक वर्षानुवर्ष चालत आलेल्या रुढी-परंपरांच्या मुळाशी जाणारे आहे. या चित्रपटाचे संगीतदेखील उत्तम आहे. प्रतीक्षा संपली आहे... रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी पुढच्या वर्षी 28 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे".

  • आलिया-रणवीरची भाईजानसोबत टक्कर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 एप्रिल रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर (Box Office) आलिया-रणवीरची भाईजानसोबत टक्कर होणार आहे.

आलिया आणि रणवीरसह 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकार देखील मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाल्याने प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com