मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर बनणार बायोपिक

रोहित शेट्टीने (Rohit Shetty) आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर बनणार बायोपिक
Mumbai Police Commissioner Rakesh Maria & Rohit ShettyDainik Gomantak

बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक असणाऱ्या रोहित शेट्टीने (Rohit Shetty) आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर बायोपिक बनवण्याची घोषणा केली आहे. जे मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी राहीले आहेत. रोहीतने आज त्याच्या सोशल मीडिया हँडलवरुन याची घोषणा केली. त्याचबरोबर त्याने माजी पोलीस आयुक्तांसोबतचा एक फोटोही शेअर केला. मारीया यांच्या जीवनावर आधारित छापलेले पुस्तक हातात घेऊन रोहितने त्यांच्याबरोबर फोटो काढला. या बायोपिकसाठी रोहितने रिलायन्स एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे. हा बायोपिक त्यांच्या कुशल कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित असेल, आणि प्रख्यात चित्रपट निर्माता रोहित शेट्टी स्वतः दिग्दर्शित करणार आहे. (Rohit Shetty will be making a film on former Mumbai Police Commissioner Rakesh Maria)

Mumbai Police Commissioner Rakesh Maria & Rohit Shetty
किंग खान अमेरिकेत बांधणार 'स्टेडियम'

रोहित शेट्टी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहे

रोहितने सोशल मीडियावर (Social Media) स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिले, "मुंबईतील 93 च्या बॉम्बस्फोटाची उकल करण्यापासून ते 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईतील अंडरवर्ल्डला निर्भयपणे सामोरे जाण्यापर्यंत त्यांनी आपली सेवा जिद्दीने पूर्ण केली. 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी...राकेश मारिया शौर्य आणि वीरतेचे समानार्थी नाव राहीले! या वास्तविक जीवनातील सुपरकॉपचा प्रवास पडद्यावर आणण्यासाठी आम्ही तयार आहोत!!!@rohitshettyPicturez."

या घोषणेबद्दल बोलताना, निर्माता आणि दिग्दर्शक, रोहित शेट्टीने एका निवेदनात म्हटले आहे की, “राकेश मारिया यांनी 36 वर्षे मुंबईतील दहशत पाहिली!! मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटापासून ते अंडरवर्ल्डच्या धोक्यापर्यंतचा त्यांचा अविश्वसनीय प्रवास आहे. यामध्ये 2008 मधील 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचाही समावेश होतो. या वास्तविक जीवनातील सुपर कॉपचा धाडसी आणि निर्भय प्रवास पडद्यावर आणण्याचा खरोखरच सन्मान आहे!!"

Mumbai Police Commissioner Rakesh Maria & Rohit Shetty
जस्मिन भसीन करतेय गुपचूप लग्न ? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

दरम्यान, राकेश मारियांनीही आपल्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येत असल्याच्या निर्णयावर विचार मांडले. ते म्हणाले, “जर्नी पुन्हा जिवंत करणे हे खूप रोमांचक आहे. विशेषत: जेव्हा रोहित शेट्टी सारख्या प्रतिभाशाली दिग्दर्शकाने हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. नॉस्टॅल्जियापेक्षा, खडतर आव्हानांना तोंड देताना मुंबई पोलिसांचे असामान्य कार्य लोकांसमोर आणण्याची ही एक मौल्यवान संधी आहे.”

राकेश मारिया यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी 1981 च्या बॅचमधून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यांनी पोलीस उपायुक्त (Transportation) म्हणून 1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाची उकल केली. पुढे त्यांनी मुंबई पोलिसात सहपोलीस आयुक्त (Crime) म्हणून काम केले. याशिवाय, त्यांनी 2003 मधील गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार या दोन बॉम्बस्फोट प्रकरणांची उकल केली. त्याचबरोबर 26/11 चा दहशतवादी (Terrorist) अजमल कसाबची (Ajmal Kasab) चौकशी करण्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.