Roohi: तिसऱ्या दिवशीही जान्हवी आणि राजकुमारची जादू बॉक्स ऑफिसवर कायम

Roohi: तिसऱ्या दिवशीही जान्हवी आणि राजकुमारची जादू बॉक्स ऑफिसवर कायम
Roohi Janhvi and Rajkumar Rao incarnation of Ruhi is still at the box office

मुंबई: जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्माचा ‘रूही’ हा चित्रपट या गुरुवारी म्हणजेच 11 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. यावर्षीचे मोठे हिंदी चित्रपट टेनेट' आणि 'वंडर वूमन 84' च्या भारतीय संग्रहांतील चित्रपटानांही 'रुही' ने  रिलीजच्या पहिल्याच दिवशी ' मागे टाकले आहे. आता दुसर्‍या दिवशीही जान्हवी आणि राजकुमारचा अवतार बॉक्स ऑफिसवर कायम आहे.

रुही चित्रपटाच्या दुसर्‍या दिवसाची कमाई  चर्चेत आली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात फक्त 3.06 कोटींची कमाई केली आहे.  तर दुसर्‍या दिवशी रुहीने 2.25 कोटी कमावले केले. ही कमाई अशा वेळी झाली आहे जेव्हा कोरोनाच्या भीतीमुळे बहुतेक लोक चित्रपटगृहात जाणे टाळत आहेत. कोरोना संक्रमण पुन्हा डोकं वर काढत आहेआणि महाराष्ट्रात तर वेगात पसरत आहे.

दरम्यान अनेक राज्यात लॉकडाउन लावण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या सुट्टीचा फायदा घेत ‘रुही’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी देशभरात हा प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट सुमारे दोन हजार स्क्रीनवर देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे.

ओपनिंग डेला 'रुही' ला मिळालेल्या प्रतिसादामुळे फिल्म इंडस्ट्रीही खूष आहे. आता दुसर्‍या दिवसाच्या कमाईने त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आगामी काळात येणारे हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याचे हे चांगले चिन्ह असल्याचे सिद्ध होत आहे. जान्हवी कपूर आणि राज कुमार राव यांच्या व्यतिरिक्त रुही चित्रपटामध्ये वरुण शर्मा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

वरुणचा फॅन बेस वेगळा असल्याने रुही या चित्रपटाला त्याचा फायदाही होत आहे. रुही चित्रपटाची कहाणी दोन जणांभोवती फिरली आहे जे आफ्जा नावाच्या अशुभ आत्म्यापासून एका वधूला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. रूही च्या आत अफ्जाची आत्मा आहे. जी हनीमूनवर आलेल्या नव्याने लग्न झालेल्या नववधूंचे अपहरण करते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com