'गेम ऑफ थ्रोन्स' सिराजमधील हे कलाकार खऱ्या आयुष्यातही आहेत 'लाईफ पार्टनर्स'

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जानेवारी 2021

ब्रिटिश अभिनेता किट हॅरिंग्टन यानी नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस साजरा केला. 'एचबीओ'च्या 'गेम ऑफ थ्रोन्स' या एचबीओ ब्लॉकबस्टर सिरीजमध्ये रंगवलेल्या 'जॉन स्नो' या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.

लंडन : ब्रिटिश अभिनेता किट हॅरिंग्टन यानी नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस साजरा केला. 'एचबीओ'च्या 'गेम ऑफ थ्रोन्स' या एचबीओ ब्लॉकबस्टर सिरीजमध्ये रंगवलेल्या 'जॉन स्नो' या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. २०१९ मध्ये संपलेल्या या सिरीजमध्ये किटने 'जॉन स्नो'ची भूमिका निभावली होती, जो तरूणांच्या गळ्यातलं ताईत बनला होता. 

किटने हॅरिंग्टन लंडनमधील रॉयल सेंट्रल स्कूल ऑफ ड्रामामधून आपलं अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं होतं. वेस्ट एंड प्ले वॉर हाऊस मधून 'अल्बर्ट नारकोट'च्या भूमिकेतून त्यानी आपल्या अभिनयाच्या करियरची सुरूवात कोली होती. 

२०११ मध्ये एचबीओच्या 'गेम ऑफ थ्रोन्स'मधून त्याने टेलीव्हिजन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच किटची त्याची पत्नी 'रोज लेस्ली'शी भेट झाली. या कल्पनारम्य मालिकेत रोजनी 'यिग्रिटची' ​​भूमिका साकारली होती, तेव्हाच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ ला त्यांनी स्कॉटलंडमध्ये लग्न केलं. 
 

संबंधित बातम्या