Netflix Most Watch Movies: नेटफ्लिक्सवरही बॉलिवूड चित्रपटांचा बोलबाला!

नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांची सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या नॉन-इंग्लिश चित्रपटांची यादी जाहीर केली.
Netflix Most Watch
Netflix Most WatchDainik Gomantak

लॉकडाऊनच्या काळात ओटीटी माध्यमांनी प्रेक्षकांचं विश्व व्यापलं असल्याने, हे चित्रपट थिएटरसोबतच ओटीटीवरही रिलीज करण्यात आले. ‘गंगूबाई काठियावाडी’ पासून ते ‘आरआरआर’ पर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आले आणि त्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद देखिल मिळाला.नेटफ्लिक्सने नुकतीच त्यांची सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या नॉन-इंग्लिश चित्रपटांची, म्हणजेच इतर भाषिक चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीतही ‘आरआरआर’ हा बॉलिवूड चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. (Netflix Most Watch Movies News)

1) आरआरआर (RRR)

आरआरआर’ (RRR) हा चित्रपट अजूनही चाहते आवडीने पाहत आहेत. या चित्रपटाने कलेक्शनमध्येही अनेक रेकॉर्ड केले आहेत. ‘बाहुबली’ फेम एसएस राजमौली (SS Rajamouli) दिग्दर्शित या चित्रपटामध्ये राम चरण (Ram Charan), ज्युनिअर एनटीआर Jr. NTR) मुख्य भूमिका साकारली आहे. तर, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत. या आठवड्यात हा चित्रपट ओटीटीवर तब्बल 13.94 मिलियन तास पाहिला गेला आहे.

2) द टेक डाऊन (The Takedown)

एकमेकांशी कधीच न पटणाऱ्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना तब्बल एका दशकानंतर पुन्हा एकत्र येण्यास भाग पाडले जाते. या मागे कारणही तसेच आहे. हे पोलीस फ्रेंच शहरातील एका हत्येचा तपास करतात, जिथे एक या हत्येचा कट रचला गेलेला असतो. या चित्रपटात ओमर साय, लॉरेंट लॅफिटे, इझिया हिगेलिन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 3.67 मिलियन तास पाहिला गेला आहे.

3) द परफेक्ट फॅमिली (The Perfect Family)

‘द परफेक्ट फॅमिली’ हा चित्रपट नावाप्रमाणेच फॅमिली ड्रामा आहे. यात एक उच्च वर्गीय कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. एक अतिशय श्रीमंत आई आपल्या मुलाच्या होणाऱ्या पत्नीला जेव्हा पहिल्यांदा पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. तिच्या मुलाने एका गरीब घरातील मुलीला पसंत केलेले असते. या चित्रपटात बेलेन रुएडा, जोस कोरोनाडो, गोन्झालो डी कॅस्ट्रो हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 3.04 मिलियन तास पाहिला गेला आहे.

Netflix Most Watch
तेजस्वीने प्रकाशने करण कुंद्रासोबत गोव्यात केला वाढदिवस साजरा, पाहा फोटो

4) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठिवाडी’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला नॉन इंग्लिश चित्रपट ठरला आहे. 25 देशांत हा चित्रपट टॉप 10 मध्ये सामील आहे. त्यामुळेच ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा चित्रपट जगभरातील चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या आठवड्यात हा चित्रपट 2.84 मिलियन तास पाहिला गेला आहे.

5) जन गण मन (Jana Gana Mana)

महाविद्यालयीन प्राध्यापकाच्या निर्घृण हत्येनंतर विद्यार्थी संतापले आहेत. एक पोलीस या प्रकरणाचा तपास सुरू करतो आणि एक वकील न्यायालयात न्याया मिळवण्यासाठी लढतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. साऊथचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जात आहे. या चित्रपटात (Movie) पृथ्वीराज सुकुमारन, सूरज वेंजारामूडू, पशुपती राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 2.23 मिलियन तास पाहिला गेला आहे.

6) जर्सी (Jersey)

क्रिकेट सोडल्यानंतर दहा वर्षांनंतर, एक हुशार पण निराश माजी फलंदाज राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याने पुन्हा क्रिकेट खेळावं अशी त्याच्या मुलाची ‘जर्सी’ची इच्छा असते. या चित्रपटात शाहिद कपूर, मृणाल ठाकूर, पंकज कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या आठवड्यात हा चित्रपट 2.11 मिलियन तास पाहिला गेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com