मला कोरोनाची लागण झालेली नाही; अफवांबाबत मुकेश खन्ना यांचे स्पष्टीकरण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

'शक्तिमान' या प्रसिद्ध मालिकेतील दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांच कोरोनामुळे निधन झाले अशी अफवा सामाजिक मध्यामांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

'शक्तिमान' या प्रसिद्ध मालिकेतील दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांच कोरोनामुळे (Covid-19) निधन झाले अशी अफवा (Rumors) सामाजिक मध्यामांवर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. मालिकेमधील शत्रूचा विनाश करणारा शक्तिमान कोरोना व्हायरसमुळे      (corona virus)  मरण पावला अशी अफवा पसरली होती. त्यानंतर मुकेश खन्ना यांनी आपला विडियो सामाजिक माध्यामातून शेयर करत अफवा उडवणाऱ्याचे तोंड बंद केले. (Rumors of Shaktiman's demise spread)

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेची टीम मुंबईत परतली 

मुकेश खन्ना यांनी यूट्यूबला  व्हिडिओ शेयर करत म्हणाले,  “तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी पूर्णपणे स्वस्थ आहे, मी सुरक्षित आहे. मला कोणत्याही दवाखण्यात दाखल केले नव्हते, मला कोरोनाची विषाणूची लागण  झाली नाही.  अशी खोटी बातमी कोण पसरवतं, मला माहिती नाही, त्यांचा हेतू काय आहे? हेही समजत नाही. अशा खोट्या बातम्यावर आता बंदी आणली पाहिजे” अशा भावना मुकेश खन्ना यांनी व्यक्त केली .    

Radhe Release Time: कुठे आणि कधी प्रदर्शित होणार सलमान खानचा राधे; जाणून घ्या

शक्तिमान या शोपासून मुकेश खन्ना प्रसिद्धीस आले आहे. या मालिकेत त्यांनी भारतातील पहिला सुपरहिरो शक्तीमानची मुख्य भूमिका साकारली होती. तसेच बी. आर. चोप्रा यांच्या पौराणिक महाभारत या मालिकेत त्यांनी भीष्म पितामहची भूमिका केली होती.

संबंधित बातम्या