केबीसीच्या कोणत्या प्रश्नामुळे सर्व 'लाईफलाईन' वापरूनही स्पर्धकाला बाहेर पडावं लागलं?

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

एकाच प्रश्नासाठी चारही लाईफलाईन वापरूनही स्पर्धेतून बाहेर पडणारा एकही उमेदवार आजवर 'केबीसी'मध्ये आला नव्हता. अशातच या कार्यक्रमाच्या १२व्या हंगामातील एका स्पर्धकाला मात्र, एका साध्या प्रश्नावर आपल्या संपूर्ण लाईफलाईन वापरूनही अचूक उत्तरापर्यंत न पोहोचता आल्याने​ फक्त  ४० हजारांसह बाहेर पडावं लागलं आहे. 

मुंबई-  'देवी और सज्जनो' शब्द कानावर पडताच 'केबीसी' साठी प्रेक्षकांच्या नजरा टेलिव्हिजन समोर किमान एका तासासाठी अक्षरश: खिळून बसतात. अनेकांना 'करोडपती' व्हायचं असतं, काहींना कोणीतरी करोडपती झालेलं बघायचं असतं. स्पर्धेतील प्रश्न कठीण असतील तर मिळणाऱ्या लाईफलाईन्सचा स्पर्धकाला उपयोग होतो. या लाईफलाईन चार असतात. प्रश्नांची काठिण्य पातळी बघितल्यास प्रत्येक स्पर्धकाला एकदा तरी स्पर्धेत लाईफलाईन घेण्याची वेळ येतेच. मात्र, एकाच प्रश्नासाठी चारही लाईफलाईन वापरूनही स्पर्धेतून बाहेर पडणारा एकही उमेदवार आजवर 'केबीसी'मध्ये आला नव्हता. अशातच या कार्यक्रमाच्या १२व्या हंगामातील एका स्पर्धकाला मात्र, एका साध्या प्रश्नावर आपल्या संपूर्ण लाईफलाईन वापरूनही अचूक उत्तरापर्यंत न पोहोचता आल्याने फक्त  ४० हजारांसह बाहेर पडावं लागलं आहे. 

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये कोशलेन्द्र सिंग तोमर हे सहभागी झाले होते. त्यांनी खेळायला सुरूवात केल्यावर सुरूवातीच्या काही प्रश्नांची उत्तरे दिल्यावर 40 हजारांसाठी पुढचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. क्रीडाविश्वाबद्दलच्या या प्रश्नामध्ये समर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या एकमेव महिलेचं नाव त्यांना सांगायचं होतं. या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांना 4 पर्याय दिले होते. यात पी. व्ही. सिंधू, कर्नम मल्लेश्वरी, मेरी कोम आणि साक्षी मलिक या नावांचा समावेश होता. या प्रश्नाने संभ्रमात पडलेल्या तोमर यांनी चारही लाईफलाईन वापरून टाकल्यावरही त्यांना निष्कर्षापर्यंत जाता आले नाही. यात हार मानत त्यांनी ४० हजारांवर समाधान मानत स्पर्धेतून माघार घेण्याचं ठरवून टाकलं. ते शेवटी एक्सपर्ट चॉईस या लाईफलाईनने सुचवलेलं उत्तर देऊन पुढे खेळू  शकले असते. मात्र, संभ्रमात पडलेल्या तोमर यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचं ठरवलं.  

या स्पर्धेत अनेकांनी लाईफलाईनचा अचूक वापर या आधी विजेतेपदापर्यंत मजल मारली आहे. मात्र, लाईफलाईनचा अचूक वापर जमला नाही तर तोमरांसारखी अवस्था होऊन क्वीट करावं लागतं. एखादा साधा प्रश्नही तुमच्या मनात किती संभ्रम निर्माण करू शकतो हे या खेळाच्या निमित्ताने समजते. 

संबंधित बातम्या