प्रत्येक स्पर्धेत पुरस्कार पटकावणारी 'साची'
Sachi who wins prizes in every competitionDainik Gomantak

प्रत्येक स्पर्धेत पुरस्कार पटकावणारी 'साची'

धारगळ येथे दीपोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या अखिल गोवा नृत्य (Dance) स्पर्धेत साची सावंत यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला.

धारगळ येथे दीपोत्सव निमित्ताने आयोजित केलेल्या अखिल गोवा नृत्य (Dance) स्पर्धेत साची सावंत यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. साचीसाठी आता पुरस्कार (Award) नवीन नाहीत. तिसरीत असताना भरतनाट्यम प्रियांका डान्सर अकादमीमध्ये तिने लावणी डान्सर म्हणून सुरुवात केली.

साऊथ इंडिया डान्स स्पर्धेत गोल्ड मेडलीस्ट बनून स्पर्धेची चॅम्पियनशिप तिने प्राप्त केली. अखिल भारतीय नृत्य-क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय गोल्ड मेडलीस्ट, शिवाय राज्य आणि देश पातळीवरील विविध स्पर्धामध्ये तिने आपला सहभाग दाखवून अनेक पुरस्कार आपल्या कामगिरीने जिंकून आणले आहेत.

Sachi who wins prizes in every competition
'सोल टू सोल' आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात

13 वर्षाची असताना तिने फॅशन मॉडेल इंडिया स्पर्धेत पहिले उपविजेतेपद पटकावले,2019 मध्ये लिटल मिस इंडिया, मिस दीपावली द्वितीय उपविजेतेपद, मिस प्रतिभावंत, अशा अनेक स्पर्धामधून तिने अनेक पुरस्कार जिंकलेले आहेत.

जेव्हा साची रंगमंचावर उभी राहते तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरून, आपला नृत्याविष्कार सादर करते. प्रेक्षकही दरवेळी साचीच्या अदाकारीने भारून गेलेले असतात. साची शाळेतही शिक्षणात आपली कर्तबगारी सिद्ध करत असते. कलेच्या क्षेत्रात तिची आई सपना सावंत व वडिलांचे पाठबळ तिला नेहमीच मिळत राहिलेले आहे. राज्य आणि देशपातळीवरच्या प्रत्येक स्पर्धेत पुरस्कार पटकावणाऱ्या साचीला अजूनही पुढचा मार्ग खुणावतो आहे. यशोशिखर गाठण्यासाठी ती ठामपणे आपले पाऊल टाकत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com