Kubbra Sait : "सेक्रेड गेम्समध्ये किस करताना मी नवाजला"...अभिनेत्री कुब्रा सैतने सांगितला तो किस्सा

सेक्रेड गेम्स फेम अभिनेत्री कुूब्रा सैतने नवाजुद्दीन सिद्दीकीचा एक किस्सा शेअर केला आहे.
Kubbra Sait
Kubbra SaitDainik Gomantak

ओटीटीच्या इतिहासात ज्या ज्या कलाकृतींची नावं लिहिली जातील त्यात सेक्रेड गेम्सचं नाव घ्यावं लागेल. एक वेगळं कथानक प्रेक्षकांना भुरळ पाडुन गेलं होतं. दिग्दर्शक अनुराग कश्यपने आजवर दिलेल्या कित्येक कलाकृतींमध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्याच्या वेगळ्या कलाकृतींसाठी ओळखला जातो.

भारतामध्ये वेबसीरिजला वेगळ्या उंचीवर नेऊन त्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात अनुराग कश्यपचे नाव घ्यावे लागेल. त्याच्या द सेक्रेड गेम्सनं लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडल्याचे दिसून आले आहे.

विक्रम चंद्रा यांच्या द सेक्रेड गेम्स नावाच्या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यपनं त्याच नावानं मालिका तयार केली. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. भारतामध्ये नेटफ्लिक्सला पाय रोवण्यात या मालिकेचा मोठा वाटा होता असे म्हटले जाते.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी, राधिका आपटे यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या. भारतातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मालिकांमध्ये सेक्रेड गेम्सचा उल्लेख केला जातो.

सेक्रेड गेम्समध्ये कुब्रा सैतची भूमिका चर्चेत आली होती. तिने साकारलेली कूकू नावाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना कमालीची आवडली. तिची तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी होती.

त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी आणि तिचे काही इंटिमेट सीनही होते. ते तर भलतेच लोकप्रिय झाले होते. अजुनही सोशल मीडियावर त्याचे मीम्स आणि व्हिडिओ नेटकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय आहेत. अशातच कुब्रानं दिलेल्या एका मुलाखतीतून केलेला खुलासा महत्वाचा आहे.

कुकू आणि गणेश (ही व्यक्तिरेखा नवाजुद्दीननं केली होती.) कुब्रानं नवाजुद्दीनचे कौतूक केले होते. त्याच्यासोबत काम करणे हा वेगळाच अनुभव होता. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे.

बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कुब्रानं नवाझुद्दीसोबतच्या इंटिमेट सीनविषयी भाष्य केले आहे. मी त्याला किस केल्यानंतर ते इंटिमेट होण्यासाठी विचारत असे. तेव्हा त्याचा चेहरा पाहण्यासारखा असायचा. तो घाबरायचा. मला त्याला कंफर्ट करण्यासाठी त्याच्याशी बोलावं लागायचं.

Kubbra Sait
The Kerala Story Day 5 Box-office Collection: 'द केरळ स्टोरी' नं बॉक्स ऑफिसवर पाचव्या दिवशी घेतली भरारी! कमावला इतक्या कोटींचा गल्ला...

किस सीन झाल्यानंतर आता सेक्स सीन करुया. असे मी त्याला म्हणायचे तेव्हा तो एकदा तर प्रचंड भांबावून गेला होता. त्याला काय बोलावे हेच कळेना. मी तर एकदा रडतच होते. आम्ही केवळ सात टेक मध्ये ते इंटिमेट सीन शुट केले होते. अगोदरच्या दिवशीच ते सीन शुट करुन त्याचे एडिटिंग केल्याचे कुब्रानं सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com