सई ताम्हणकरला अकारण ट्रोल कराल तर याद राखा...

दैनिक गोमन्तक
रविवार, 3 जानेवारी 2021

सई ताम्हणकरने पून्हा एकदा ट्विटरवर पुनरागमन केलं आहे. पण सोबत एक वॉर्निंगही दिली आहे. काही महिन्यांनी मी ट्विटरवर परत आले आहे.

मुंबई: सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.  सई ताम्हणकरने पून्हा एकदा ट्विटरवर पुनरागमन केलं आहे. पण सोबत एक वॉर्निंगही दिली आहे. काही महिन्यांनी मी ट्विटरवर परत आले आहे. पण मला जर अकारण ट्रोल केलं तर तसंच उत्तर दिलं जाईल अशी वॉर्निंग तिने ट्रोलर्सना दिली आहे. गेले काही महिने सई ताह्मणकर ट्विटरवर फारशी अॅक्टिव्ह नव्हती. २१ सप्टेंबर 2020 नंतर तिने थेट नव्या वर्षी म्हणजे १ जानेवारीला नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारं ट्विट केलं. त्यानंतर आज काही वेळापूर्वी सईने ट्विट करत मी पुन्हा एकदा ट्विटरवर अॅक्टिव्ह झाले आहे पण अकारण ट्रोल केलं तर तसंच उत्तर दिलं जाईल असं ट्विट सईने केलं आहे.

सई ताम्हणकर ही मराठीतली यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने धुरळा या सिनेमात केलेल्या कामाचं खूप कौतुक झालं. तसंच गर्लफ्रेंड, राक्षस या सिनेमातल्या तीच्या भूमिकाही गाजल्या आहे. सई ताम्हणकर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर नेहमी अॅक्टिव्ह असते. पण गेल्या काही महिन्यांपासून ती ट्विटरवर अॅक्टिव्ह नव्हती. पण आता ती ट्विटरवरही अॅक्टिव्ह झाली आहे. पण एक रोकठोक ट्विट करत. तिने हे ट्विट ट्रोलर्सना एक इशाराच दिला आहे.

आणखी वाचा:

अनुष्का म्हणाली प्रेग्नेसीचा स्ट्रेस नको, एन्जॉय करा...! -

संबंधित बातम्या