अभिनेता सैफ अली खानला का मागावी लागली माफी?

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 7 डिसेंबर 2020

आपल्या एका वक्तव्यामुळे अभिनेता सैफ अली खान सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. लोकांच्या भावना दुखावू नये म्हणून त्याने आपले वक्तव्य मागे घेत लोकांची माफी मागितली आहे. 

मुंबई- आपल्या एका वक्तव्यामुळे अभिनेता सैफ अली खान सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. लोकांच्या भावना दुखावू नये म्हणून त्याने आपले वक्तव्य मागे घेत लोकांची माफी मागितली आहे. 

काय वक्तव्य केले होते?  

सैफ अली खानने 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, 'राक्षसराजचे पात्र साकारणे अतिशय मजेदार असेल. आम्ही या पात्राला थोडं मानवी करण्याचा प्रयत्न करू. सीतेचे अपहरण आणि रामाबरोबर युद्धाचे औचित्य सिद्ध करणार आहोत. कारण रावणाची बहिण शुर्पनखा हिचे नाक लक्ष्मणाने कापले होते.'    
 
यावर भाजपचे आमदार राम कदम चांगलेच संतप्त झाले. हिंदुंच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचे प्रयत्न केले तर ते खपवून घेतले जाणार नाही. ते पुढे म्हणाले, 'सैफ अली खान आदिपुरूष नावाच्या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहेत. ते रावणाच्या भूमिकेला हिरो सारखी साकारण्याची गोष्ट करत आहेत. रावणाच्या कामांना सिनेमाच्या माध्यमातून न्याय देणार हे कसे शक्य आहे?'
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंदू धर्माच्या आस्थांना ठेच पोहचवण्याचे काम केल्यास हिंदू समाज ते सहन करणार नाही, अशी धमकीच दिली आहे. बॉलिवूडमध्ये हिंदूंच्या भावनांना ठेच पोहचवण्याचा ट्रेंड वाढत जात असल्याचे मत त्यांनी एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केले.   

हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात ही असे प्रयत्न केले जात आहेत. सैफ दुसऱ्या धर्मांबरोबर असे का करत नाही. मी एक हिंदूच्या नात्याने सांगू इच्छितो की आमच्या भावनांना ठेच पोहचली नाही पाहिजे, असे टीकात्मक मत राम कदम यांनी व्यक्त केले.

 दरम्यान, या चित्रपटाची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. 'आदिपुरूष'या मेगाबजेट चित्रपटात बाहुबलीचा अभिनेता प्रभास प्रभुराम चंद्राच्या भूमिकेत समोर येणार आहे. सीतेची भूमिका कृती सेनन साकारत असून सैफ अली खान या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. आयएमडीबीनुसार हा सिनेमा २०२२ मध्ये रिलीज होणार असून दिग्दर्शक ओम राऊत या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत.   

 

संबंधित बातम्या