सैफ आणि अर्जुन यांचा 'Bhoot Police' चित्रपट होणार लवकरच रिलीज
Horror Comedy Bhoot PoliceDainik Gomantak

सैफ आणि अर्जुन यांचा 'Bhoot Police' चित्रपट होणार लवकरच रिलीज

सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम का कलाकारांचा, Bhoot Police हा हॉरर कॉमेडी चित्रपट 17 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

सैफ अली खान, अर्जुन कपूर, (Saif Ali Khan and Arjun Kapoor) जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम या कलाकारांचा, भूत पोलिस हा हॉरर कॉमेडी चित्रपट (Horror Comedy Bhoot Police) 17 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सैफ अली खान आणि अर्जुन कपूरचा नवा चित्रपट भूत पोलिस 17 सप्टेंबरला डीजनी + हॉटस्टारवर (Disney+ Hotstar) रिलीज होणार आहे. दरम्यान त्यांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली. सैफ आणि अर्जुन या चित्रपटात भुतांच्या भूमिकेत आहेत. सैफने सकरलेले पात्र विभूती , तर अर्जुनने साकारले पात्र चिरौंजी नावाचे आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बहुतांश हिमाचल प्रदेशात झाले आहे.

Horror Comedy Bhoot Police
Happy Birthday Radhika Apte: म्हूणन.. स्वतःच्याच लग्नात घातली तिने फाटकी साडी

एका नवीन मुलाखतीत बोलताना सैफने खुलासा केला की चित्रपट कसा बनवायचा याबद्दल तो आणि दिग्दर्शक पवन कृपलानी एका मुद्यावर ठाम होते. दरम्यान अर्जुनला त्याची पहिली हॉरर-कॉमेडी करण्याबद्दल विचारण्यात आले. तेव्हा अर्जुन म्हणाला "जेव्हा मी ते वाचले, तेव्हा माझ्यासाठी भावांमधील सौहार्द, भांडणे आणि संघर्ष या कथानक अलगद उलगडत गेले आणि मला ते आवडले". ते दोघे कधीच एकत्र येत नाहीत ही वस्तुस्थिती होती आणि ती खरोखर छान आणि मनोरंजक होती.

Horror Comedy Bhoot Police
IFFI 2021: गोमंतकीय चित्ररसिकांना इफ्फीचे वेध

आपल्याकडे साधारणपणे दोन विचार असतात जे समान विचार करतात आणि एकत्र येतात. येथे एक एक साधा सरळ माणूस आहे , ज्याला सरळ राहायचे आहे, आणि दूसऱ्याला लोकांना भीती घालून खेळणे पसंत होते आणि ते तो आपल्या फायद्यासाठी वापरत होता. मला प्रेम-द्वेष संबंध आणि साहसाचा सूर खूप आवडला. ”सैफ हा त्याचा सहकलाकार आहे हे माहीत होतेच , त्याने हा चित्रपट करण्याचे मोठे कारण होते. दोन प्रमुख पात्रांमध्ये चित्रपटाला कशाप्रकारे बोलणे आवश्यक आहे, हे त्याने स्पष्ट केले, आपला सहकलाकार कोण होता हे जाणून घेणे महत्त्वाचे होते. “मी त्याच्यामुळे हा निर्णय घेतला. मी त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक होतो. ” असे मत अर्जुन कपूर ने दिलेल्या मुलाखतीत मांडले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com