Saira Banu यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

गुरुवारी हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते की सायरा बानो यांना हृदयाची समस्या (acute coronary syndrome) असल्याचे निदान झाले आहे.
Saira Banu यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Saira BanuDainik Gomantak

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) या रुग्णालयातून डिस्चार्ज (discharged from a hospital) मिळाल्यानंतर घरी परतल्या आहेत, असे त्यांचे जवळचे कौटुंबिक मित्र फैसल फारुकी (close family friend Faisal Farooqui ) यांनी रविवारी सांगितले. जुलैमध्ये पती दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर डिप्रेशन मध्ये असलेल्या 77 वर्षीय सायरा बानो यांना श्वासोच्छवास, उच्च रक्तदाब आणि उच्च साखरेच्या त्रासामुळे 28 ऑगस्ट रोजी खार येथील हिंदुजा रुग्णालयात, दाखल करण्यात आले होते.

Saira Banu
Kangana Ranaut चा 'थलायवी' थिएटर रिलीजसाठी सज्ज

कौटुंबिक मित्र फारूकी यांनी सांगितले की, "सध्या सायरा जी ठीक आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता त्या घरी परतल्या आहेत. सध्या त्या विश्रांती घेत आहे. तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद" गुरुवारी हिंदुजा रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले होते की सायरा बानो यांना हृदयाची समस्या (acute coronary syndrome) असल्याचे निदान झाले आहे.

Saira Banu
दिशा पाटणीच्या 'किकला' टायगर श्रॉफची रिॲक्शन,Video Viral

सायरा बानो यांचे पती स्क्रीन आयकॉन दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी वयाच्या 98 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. 'सगीना' आणि 'गोपी' यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेल्या या जोडप्याने 1966 मध्ये लग्न केले होते. सायरा बानोने 1961 मध्ये "जंगली" चित्रपटातून शम्मी कपूरच्या बरोबरीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि 'ब्लफ मास्टर', 'झुक गया आसमान', 'आय मिलान की बेला', 'प्यार मोहब्बत', 'व्हिक्टोरिया' सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी बहारदार काम केले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com