Salman - Samantha : समंथा आता सल्लूभाईसोबत रोमान्स करणार ?... नव्या चित्रपटाची चर्चा

साऊथची अभिनेत्री समंथा रुत प्रभू सध्या सलमान खानसोबतच्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.
 Salman Khan - Samantha
Salman Khan - Samantha Dainik Gomantak

Samantha Ruth Prabhu upcoming Movie with Salman Khan : साऊथची ब्यूटी क्वीन आणि एकेकाळची जिची हीट जोडी नागा चैतन्यशी जमली होती ती समंथा रुत प्रभू सध्या तिच्या एका आगामी प्रोजेक्टमुळे चांगलीच चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार समंथा तिचा आगामी चित्रपट बॉलीवूडचा भाईजान सलमान खानसोबत करणार असल्याची चर्चा आहे.

समंथा आणि साऊथचे सुपरस्टार

समंथा रुथ प्रभूने( Samantha Ruth Prabhu) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक चित्रपटांतून चाहत्यांना घायाळ केलं आहे. थलपती विजय, नागा चैतन्य, अल्लू अर्जून यांसारख्या साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्यांसोबत तिने अनेकदा स्क्रीन शेअर केली आहे. आता समंथा बॉलीवूडमध्येही आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. 

'सिटाडेल' मध्ये वरुण धवनसोबत

'द फॅमिली मॅन 2' मधील आपल्या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकल्यानंतर ही अभिनेत्री आता वरुण धवनसोबत'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

अमर उजालाच्या वृत्तानुसार, समंथा रुथ प्रभू पुढील चित्रपटात सलमान खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

सलमान आणि समंथा

'अंतवा' या गाण्याने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या समंथाने अनेक बॉलिवूड दिग्दर्शकांनाही भूरळ घातली होती .

आता बातमी येत आहे की लवकरच ही अभिनेत्री बॉलिवूडचा भाईजान सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

करण जोहर त्याच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवणार असल्याचे बोलले जात आहे.

समंथा, त्रिशा आणि अनुष्का शेट्टी

 रिपोर्ट्समध्ये असाही दावा केला जात आहे की, समंथा व्यतिरिक्त चित्रपटात त्रिशा आणि अनुष्का शेट्टीसोबतही चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उपचारासाठी समंथा परदेशात

समंथाने तिच्या आजारपणामुळे काही काळ उपचारासाठी आणि विश्रांतीसाठी घालवणार असल्याचं पूर्वीच जाहीर केलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार समंथा मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. समंथा सध्या उपचारासाठी परदेशात असली तरीही सोशल मीडियावर (S सतत सक्रिय असते. नुकतीच तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

 Salman Khan - Samantha
Shahrukh's Jawan : 'जवान'मधला हॉस्पीटलच्या दुरावस्थेचा तो सीन उत्तरप्रदेशातल्या त्या घटनेवर आधारित? कोण आहेत डॉ. कफिल खान?

समंथाची एक पोझ

सोशल मिडीयावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये समंथा पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये पाऊटसोबत पोज देताना दिसत आहे. फॅन्ससाठी समंथा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com