सलमान-आमिर खान मध्ये ये दूरियां...

पडद्यावर सलमान आणि आमिरची केमिस्ट्री, ऑफस्क्रीन दोघांमध्ये वेगळेच वाद
Salman and Aamir khan chemistry
Salman and Aamir khan chemistryDainik Gomantak

बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीत सुपरस्टार खानच्या चर्चा जोरात रंगल्या जातात. मग तो शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खानचा (Salman Khan) 'करण अर्जुन' (Karan Arjun) असो किंवा आमिर खान (Amir Khan) आणि सलमान खानचा ' अंदाज अपना अपना' (Andaaz Apna Apna) असो. या चित्रपटांना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटाद्वारे आमिर खान आणि सलमान खान यांनी प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. पण या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान या दोन स्टार्समधील प्रकरण थोडेसे चिघळले होते. पडद्यावर सलमान आणि आमिरची केमिस्ट्री दिसली होती, मात्र ऑफस्क्रीन हे प्रकरण काही वेगळेच होते. याबाबतचा खुलासा खुद्द आमिर खानने केला होता. आमिर खान एकदा सलमान खानच्या वागण्याबद्दल बोलला होता. त्यावेळी आमिर खानला सलमान खानची वागणूक आवडली नव्हतं असे त्याने सांगितले होते. (Salman and Aamir khan chemistry on screen but different argument between offscreen)

सलमान खानच्या वागण्यावर आमिर खानचे भाष्य

आमिरने सलमान खानपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. 1994 मध्ये सलमान आणि आमिरने अंदाज अपना अपना या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांनाही कास्ट करण्यात आले होते. एकीकडे आमिर आणि सलमानमधील रिलेशन बरोबर नसताना, त्याचवेळी रवीना आणि करिश्मा यांच्यात खूप भांडण झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

Salman and Aamir khan chemistry
1 महिन्याचा कडक उपवास केल्यानंतर अजय देवगण दर्शनासाठी पोहोचला सबरीमाला मंदिरात

मला तेव्हा सलमान आवडला नव्हता

2013 मध्ये आमिर खान करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये आला होता. या टॉक शोमध्ये आमिरने खुलासा केला की, त्याला त्यावेळी सलमान खानची वागणूक आवडली नव्हती. आमिर खान म्हणाला होता- 'अंदाज अपना अपनामध्ये सलमानसोबत काम करण्याचा माझा अनुभव फारसा चांगला नव्हता, तेव्हा मला सलमान आवडला नव्हता. सलमान खान खूप असभ्य आहे हे मी त्यावेळी पाहिले. पण दुर्लक्ष केले. मला सलमानसोबत पुन्हा काम करायचे नव्हते. म्हणून मी त्याच्यासोबत काम करणे सोडून दिले.

Salman and Aamir khan chemistry
'आनंद' चित्रपटासाठी राजेश खन्ना यांना दिग्दर्शकाच्या सर्व अट मान्य होत्या

अशी झाली सलमान आणि आमिरची मैत्री

आमिर म्हणाला होता- 'मी खूप कठीण काळातून जात असताना सलमान खान माझ्या आयुष्यात परत आला. माझा आणि रीनाचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर सलमानने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही पुन्हा भेटलो आणि आम्ही एकत्र मद्यपानही केले होते. त्या दिवशी आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखले. मग आमची खरी मैत्री सुरू झाली होती पण ती जास्त काल टिकू सकली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com